'सैयारा'पेक्षा खतरनाक प्रेमी! गर्लफ्रेंडला उडवण्याचा रचला कट, होम थिएटरमध्ये बॉम्ब लपवून गिफ्ट घरी पाठवलं अन् नंतर घडलं..

Today Shocking Viral News :  खैरागढ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका नाराज प्रियकराने त्याच्या पहिल्या प्रेयसीला आणि पतीला मारण्याचा कट रचला होता.

IED Bomb Gift Viral News
IED Bomb Gift Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी बॉम्ब निष्क्रिय केला..6 आरोपींना केली अटक

point

तरुणीचा पहिला प्रियकर मास्टरमाईंड

point

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?

Today Shocking Viral News :  खैरागढ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका नाराज प्रियकराने त्याच्या पहिल्या प्रेयसीला आणि पतीला मारण्याचा कट रचला होता. त्याने लग्नानंतर त्याच्या प्रेयसीच्या घरी एक होम थिएटर गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. ज्यामध्ये दोन किलोग्रॅम आयईडी बॉम्ब लपवण्यात आला होता. दरम्यान, पतीच्या सतर्कतेमुळं मोठा अपघात टळला.

या घटनेमुळं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हाय अलर्ट जारी करून पुढील तपास सुरु केला आहे. इतक्या मोठ्या बॉम्बचं कनेक्शन कोणत्या ना कोणत्या दहशतवादी संघटनेशी असू शकतं, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना गंडई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?

येथील एका तरुणीचं नुकतंच लग्न झालं होतं. तिनं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केल्यानं तिचा पहिला प्रियकर नाराज होता. त्यामुळे त्याने बदला घेण्याचं ठरवलं. त्याने एका होम थिएटरच्या आतमध्ये दोन किलो वजनाचा आयईडी बॉम्ब लपवला होता आणि तो गिफ्ट म्हणून तरुणीच्या घरी पाठवला. त्यानंतर या तरुणीने आणि तिच्या पतीने हे गिफ्ट घरी आणलं, पण पतीला होम थिएटर पाहिल्यावर संशय आला. गिफ्ट उघडल्यावर त्याला यामध्ये काहीतरी वेगळं असल्याचं जाणवलं आणि त्याने त्वरित पोलिसांना कळवलं.

हे ही वाचा >> "खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, खांद्यावर बंदूक ठेऊन...",मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नेमकं काय म्हणाले?

पोलिसांनी बॉम्ब निष्क्रिय केला..6 आरोपींना केली अटक

या गंभीर घटनेची खबर मिळताच स्थानिक पोलीस बॉम्ब डिफ्यूज स्क्वॉडसह तातडीनं घटनास्थळी पोहोचले. जेव्हा त्यांनी सावधपणे तो पॅकेट उघडला, तेव्हा आतमध्ये एक विस्फोटक डिव्हाईस पाहून सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी बॉम्ब निष्क्रिय करून पुढील तपास सुरु केला आहे.

तरुणीचा पहिला प्रियकर मास्टरमाईंड

पोलीस तपासात उघडकीस आलं की, तरुणीचा पहिला प्रेमीच या कटाचा मास्टरमाईंड होता. प्रेयसीच्या लग्नामुळे तो नाराज होता आणि तिचा बदला घेण्यासाठी त्याने हे भयानक कृत्य केलं. दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केलीय.

हे ही वाचा >> Dahi Handi 2025: पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार

हे वाचलं का?

    follow whatsapp