7.8 कोट्यवधी हडपले, मुंबई पोलिसांना एक हिंट; डिजिटल अरेस्ट महिलेला कसं वाचवलं?

निलेश झालटे

मुंबईत एका कोट्यधीश वयोवृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करण्यात आली होती. पण मुंबई पोलिसांनी तिची सुटका केली. जाणून घ्या हे प्रकरण काय आहे.

ADVERTISEMENT

7 crores snatched a hint to mumbai police how was digital arrest of woman saved
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

मुंबई: मायानगरी मुंबई... दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठीत महिला... जिच्या मुली परदेशात नोकरीला... बक्कळ पैसा. एके दिवशी अचानक तिला एक फोन येतो, पोलीस असल्याचं सांगितलं जातं. तुमच्या पैशांचा वापर मनी लाँडरिंगसाठी केला जातो, यामुळं कारवाई होऊ शकते, अटक होऊ शकते, असं सांगून घाबरवलं जातं. याच नंतर सुरु होतो डिजिटल अरेस्टचा खेळ. मग ती 81 वर्षांची महिला ते लोक जसं सांगतील तसं करायला लागते. ती महिला आपली सेव्हींग, एफडी आणि म्युच्युअल फंडमधून एकूण 7.8 कोटी रुपये स्वत:ला पोलीस असं सांगितलेल्या व्यक्तींच्या खात्यात ट्रान्सफर करते.

हा सगळा सायबर भामट्यांचा खेळ. मुंबईतील एका वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करत आणि तिची 7 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण सध्या गाजतं आहे.

या डिजिटल अरेस्ट प्रकरणात 81 वर्षीय महिलेवर सायबर भामट्यांनी इतकी भीती घातलेली की, तिने खऱ्या पोलिसांसाठी आपल्या घराचे दरवाजे बंद केले. अखेर पोलीस घरमालकाच्या मदतीने तिच्या घरात घुसले आणि तिला डिजिटल अरेस्टमधून बाहेर काढले. जर पोलिसांनी सतर्कता दाखवली नसती तर या महिलेने आणखी पैसे घालवले असते.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? 

डिजिटल अरेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती आपण पोलीस किंवा तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं सांगून फोन करते. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जातं. तुम्हाला सतत फोन करुन किंवा मेसेजेस पाठवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगण्यात येतं, घाबरवण्यात येतं. या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर पैशाची मागणी केली जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp