नराधम मुलाने वृद्ध आईवरच दोनदा लैंगिक अत्याचार... म्हणाला, “ही तर तुझी शिक्षा आहे...”
राजधानी दिल्लीतील हाज कौझी परिसरातून पोलिसांनी 39 वर्षीय नराधम मुलाला आपल्या 65 वर्षीय वृद्ध आईवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

नराधम मुलाने वृद्ध आईवरच दोनदा केला बलात्कार

आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
Rape Case: राजधानी दिल्लीमध्ये आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. हाज कौझी परिसरातून पोलिसांनी 39 वर्षीय नराधम मुलाला आपल्या 65 वर्षीय वृद्ध आईवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित आरोपीवर त्याच्या वृद्ध आईवर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे काही वर्षांपूर्वी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असल्यामुळे तो पीडितेला शिक्षा देत असल्याचा मुलाने दावा केला.
मुलाने बलात्कार केल्याची तक्रार...
‘हिन्दुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, पीडित वृद्ध महिला तिच्या 25 वर्षीय मुलीसोबत शुक्रवारी हौज कौझी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिच्या मुलाने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची तक्रार दाखल केली. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा पती निवृत्त सरकारी कर्मचारी असून ती आपला पती, आरोपी मुलगा आणि त्याच्या मुलींसोबत हौज काझी परिसरात राहते. महिलेची मोठी मुलगी विवाहित असून त्याच परिसरात तिच्या सासरी राहते.
आईचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा..
पीडित महिलेनं पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की 17 जुलै रोजी पीडिता, तिचा पती आणि धाकटी मुलगी सौदी अरेबियाला गेले होते. आठ दिवसांनंतर, ते परदेशात असताना आरोपी मुलाने वडिलांना फोन करून त्यांना परत येण्यास सांगितलं. पीडिता म्हणाली, माझा मुलगा सतत आम्हाला दिल्लीला परत येण्यास सांगत होता. कारण, माझ्या पतीने मला घटस्फोट द्यावा, असं त्याचं म्हणणं होतं. तो लहान असताना आणि माझे पती कामानिमित्त बाहेर असताना माझे इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचा देखील त्याने दावा केला.” मुलाच्या अशा बोलण्याने वैतागून 1 ऑगस्ट रोजी कुटुंबीय परत दिल्लीला आले. घरी परतल्यानंतर आरोपीने पीडित आईला मारहाण केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा: मृत बाळाला दिला जन्म, पण पतीने नाकारलं अन् म्हणाला, “आधी डीएनए टेस्ट...” महिलेसोबत नेमकं काय घडलं?
मागील कृत्यांची शिक्षा म्हणून बलात्कार...
मुलाच्या मारहाणीला घाबरून पीडित महिला घर सोडून तिच्या मुलीच्या माहेरी जाऊन राहू लागली. मात्र, 11 ऑगस्ट रोजी प्रकरण टोकाला पोहचत असल्याचं जाणून ती तिच्या घरी परतली. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने आरोप केला की त्या दिवशी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास आरोपीने कुटुंबातील इतर सदस्यांना त्याला त्याच्या आईशी एकट्यात बोलायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर, त्याने तिला एका खोलीत बंद केले आणि तिच्यावर बलात्कार केला. तो म्हणाला की तो त्याच्या आईला तिच्या मागील कृत्यांची शिक्षा देत आहे. त्यावेळई पीडिता सतत त्याची आई असल्याचं सांगून त्याला विनवण्या करू लागली.
हे ही वाचा: 7.8 कोट्यवधी हडपले, मुंबई पोलिसांना एक हिंट; डिजिटल अरेस्ट महिलेला कसं वाचवलं?
आरोपील पोलिसांच्या ताब्यात
महिलेने लाजेखातर तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं नाही आणि स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तिच्या मुलीच्या खोलीत झोपू लागली. गुरुवारी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास पीडिता झोपलेल्या खोलीत आरोपी मुलगा घुसला आणि पीडितेवर पुन्हा लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी, पीडितेने तिच्या धाकट्या मुलीला संपूर्ण घटना सांगितली आणि त्यावेळी मुलीवे तिच्या आईला पोलिसांकडे जाण्यास सांगितलं. त्यानंतर आई आणि मुलीने हौज कझी पोलिस स्टेशनकडे धान घेतली आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.