मृत बाळाला दिला जन्म, पण पतीने नाकारलं अन् म्हणाला, “आधी डीएनए टेस्ट...” महिलेसोबत नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेने मृत मुलीला जन्म दिला. मात्र, त्यावेळी तिच्या पतीने बाळाला स्वतःचं म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि इतकेच नव्हे तर त्याने डीएनए टेस्ट करण्याचा आग्रह धरला.

बातम्या हायलाइट

महिलेनं दिला मृत बाळाला जन्म

पतीने बाळ स्वीकारण्यास दिला नकार...

पतीने केली डीएनए टेस्टची मागणी
Crime News: उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील रुग्णालयात एक हादरवून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेने मृत मुलीला जन्म दिला. मात्र, त्यावेळी तिच्या पतीने बाळाला स्वतःचं म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि इतकेच नव्हे तर त्याने डीएनए टेस्ट करण्याचा आग्रह धरला. या घटनेने रुग्णालयाक खळबळ माजली. नेमकं काय घडलं?
पोलीस घटनास्थळी पोहचले अन्...
ही संपूर्ण घटना सैदपूर महिला रुग्णालयातील असून गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. 2 वर्षांपूर्वी सैदपूर तहसीलच्या बडिहारी गावातील रहिवासी असलेल्या आरती देवीचा विवाह वाराणसीच्या धौरहराचा रहिवासी असलेल्या धनंजय याच्याशी झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीने रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून नवजात बाळाचा मृतदेह मध्यरात्री पोस्टमॉर्टमसाठी शवागारात पाठवण्यात आला.
पत्नीपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत
लग्नाच्या काही महिन्यांनंतर, त्या जोडप्यात भांडणं सुरू झाली आणि त्यांचं नातं दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं. दरम्यान, आरती गर्भवती राहिली आणि त्यावेळी बाळंतपणासाठई तिच्या सासरच्यांनी तिला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवलं. मात्र, पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याकारणाने पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. याच दरम्यान, गुरुवारी आरतीला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला सैदपूर येथील महिला रुग्णालयात दाखल केलं आणि तिथे दुपारच्या सुमारास आरतीने मृत मुलीला जन्म दिला.
हे ही वाचा: 7.8 कोट्यवधी हडपले, मुंबई पोलिसांना एक हिंट; डिजिटल अरेस्ट महिलेला कसं वाचवलं?
बाळाचे अंत्यसंस्कार करण्यापासून रोखलं
पत्तीने बाळाला जन्म दिल्याचं कळताच धनंजय रात्री रुग्णालयात पोहोचला आणि त्याने हे बाळ स्वत:चं नसल्याचं सांगून नवजात बाळाचे अंत्यसंस्कार करण्यापासून रोखलं. त्यानंतर पती पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यासोबतच डीएनए टेस्टची मागणी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी सुद्धा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजून घेण्याच्या मनस्थितीच नव्हता.
हे ही वाचा: EVM मतदानाची फेरमतमोजणी, सुप्रीम कोर्टामुळे हरलेला उमदेवार जिंकला.. देशातील पहिलीच घटना प्रचंड चर्चेत
त्यावेळी धनंजयने सांगितलं की लग्नानंतर त्याचे त्याच्या पत्नीशी कधीच चांगले संबंध राहिले नाहीत. इतकंच नव्हे तर तो कधीही त्याच्या पत्नीशी संपर्कात राहिला नसल्याचं देखील त्याने सांगितलं. यानंतर, पोलिस रुग्णालयात पोहोचले आणि मध्यरात्री मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शवागारात पाठवला.