पत्नी पतीकडे येत नव्हती म्हणून... सगळ्या मर्यादाच ओलांडल्या अन् स्वत:च्या चार मुलांना सुद्धा...
अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीने पत्नीशी झालेल्या भांडणातून टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, त्यांची चार मुलं सुद्धा त्यांच्यातील वादाला बळी पडल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्या हायलाइट

पती-पत्नीच्या किरकोळ वादातून टोकाचा निर्णय

चार मुलांसोबत केली आत्महत्या..
Suicide Case: अहिल्यानगरमधून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथे अरुण काळे नावाच्या व्यक्तीने पत्नीशी झालेल्या भांडणातून टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने परिसरात स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेत अरुणने वैतागून स्वत:चं आयुष्य संपवलं आणि त्यांची चार मुलं सुद्धा त्यांच्यातील वादाला बळी पडल्याचं सांगण्यात येत आहे. नेमकं काय घडलं?
कुटुंबातील सदस्यांना संपवण्याचा निर्णय
पतीसोबत सतत वाद होत असल्याकारणाने पत्नी घर सोडून माहेरी राहायला गेली. पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेल्याने आणि पुन्हा तिच्या नवऱ्याच्या घरी न परतल्याने पती इतका नाराज झाला की त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
चार मुलांसह विहिरीत मारली उडी
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण काळे नावाच्या तरुण त्याच्या कुटुंबियांसोबत चिखली कोरेगाव तालुक्यातील श्रीगोंदा परिसरात राहत होता. आठ दिवसांपूर्वी संबंधित तरुणाने त्याच्या पत्नीशी एका गोष्टीवरून मोठं भांडण झालं होतं. या वादामुळे संतापलेली पत्नी तिच्या माहेरी निघून गेली आणि नवऱ्याच्या घरी परत येण्यास तिने नकार दिला. पत्नीला बऱ्याचदा समजावूनही ती त्याच्या पतीकडे परत न गेल्याने अरुण खूप नैराश्यात होता. याच रागाच्या भरात त्याने त्याच्या चारही मुलांना विहिरीत ढकललं आणि स्वतःही त्यात उडी मारून आत्महत्या केली.
हे ही वाचा: ‘सेक्स चॅट’च्या जाळ्यात अडकला अन् 94 लाख रुपये बुडवून बसला! न्यूड फोटो अन्... मुंबईतील डॉक्टरसोबत घडलं तरी काय?
घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे त्यांना विहिरीत अरुणचा मृतदेह आढळला. धक्कादायक बाब म्हणजे अरुणचा एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेला होता. त्याने स्वतःला बांधून घेऊन आपलं जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मृतांची नावं आली समोर
या घटनेतील अरुण काळे, शिवानी (8 वर्षे), प्रेम (7 वर्षे), वीर (6 वर्षे) आणि कबीर (5 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी अद्याप दोन मृतदेह बाहेर काढले असून उर्वरितांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: नराधम मुलाने वृद्ध आईवरच दोनदा लैंगिक अत्याचार... म्हणाला, “ही तर तुझी शिक्षा आहे...”
या दुःखद घटनेने संपूर्ण अहिल्यानगर हादरून गेलं आहे. किरकोळ कौटुंबिक वादामुळे एवढी मोठी दुर्घटना घडू शकते, यावर लोकांचा विश्वासच बसत नाहीये. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.