भाजपा महिला नेत्याला लग्नाचं आमिश दाखवून शारीरिक छळ... मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख अन् जाळ्यात ओढलं...
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ‘भाजपा’च्या महिला नेत्याला लग्नाचं खोटं आमिश दाखवून तिला धमकावण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडितेचा शारीरिक छळ केला असून तिला खोटी माहिती देऊन तिला दिशाभूल केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

बातम्या हायलाइट

भाजपा महिला नेत्याचा शारीरिक छळ

मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख अन् जाळ्यात ओढलं...

लग्नाचं खोटं आमिश दाखवून फसवणूक
Crime news: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ‘भाजपा’च्या महिला नेत्याला लग्नाचं खोटं आमिश दाखवून तिला धमकावण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित पीडितेने सुशांत गोल्फ सिटीमधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्रकरणातील आरोपीने पीडितेचा शारीरिक छळ केला असून तिला खोटी माहिती देऊन तिला दिशाभूल केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
महिला नेत्यासोबत मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख...
लखनऊच्या अर्जुनगंज दयानंदपुरम परिसरातील रहिवासी असलेल्या दीपा कश्यप या सध्या भाजपा पक्षाच्या बूथ अध्यक्षा असल्याची माहिती आहे. संबंधित पीडितेची हर्शवर्धन कश्यप नावाच्या तरुणासोबत मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख झाल्याचं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करताना महिला नेत्यानं सांगितलं. तसेच, पुढे पीडितेनं सांगितलं, की तिला हर्शवर्धनने तो घटस्फोटित असल्याचं सांगितलं. मात्र, त्याची माहिती काढल्यानंतर त्याचं आधीच लग्न झालं असून त्याला दोन मुलं असल्याचं समोर आलं. त्यावेळी तो मारुती कंपनीमध्ये असिस्टंट सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचं त्याने पीडितेला सांगितलं.
हे ही वाचा: 15 दिवसांनंतर लंडनला जाणार होती, पण अचानक 23 व्या मजल्यावरुन उडी मारली अन्... मुंबईतील धक्कादायक घटना
पीडित महिलेसोबत गैरवर्तन
13 जून रोजी महिला त्या आरोपी तरुणाला भेटली आणि त्यावेळी त्या दोघांमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल बोलणं झालं. यादरम्यान, त्याठिकाणी अंधार होता आणि त्याचाच फायदा घेऊन आरोपीने पीडित महिलेसोबत गैरवर्तन केलं. तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. इतकेच नव्हे, तर हर्शवर्धन 5 जुलै रोजी पीडितेच्या घरी तिला भेटायला गेला आणि तिच्यासोबत लग्न करण्याच्या बहाण्याने त्याने महिला नेत्यासोबत पुन्हा अश्लील वर्तन केलं. या सगळ्या प्रकारानंतर, 11 जुलै रोजी आरोपी पीडितेला व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून धमकी देऊ लागला आणि त्यावेळी त्याचे फोटोज डिलीट करण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर आरोपी तरुणाने महिला नेत्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
हे ही वाचा: बहीण गेली प्रियकरासोबत पळून! भावाचा संताप अन् दाजीला केलं किडनॅप... नंतर काय घडलं?
आरोपीला दोन मुलं असल्याची माहिती...
‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, संबंधित महिला नेत्यानं आरोपीबद्दल चौकशी आणि तपास केल्यानंतर तो आपल्या आई आणि मुलासोबत त्याच्या वडिलोपार्जित घरात राहत असल्याची माहिती मिळाली. इतकेच नव्हे तर आरोपी तरुणाने मॅट्रिमोनिअल साइटवर त्याची बनावट आयडी बनवल्याचं देखील समोर आलं. पोलिसांनी संबंधित आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.