बहीण गेली प्रियकरासोबत पळून! भावाचा संताप अन् दाजीला केलं किडनॅप... नंतर काय घडलं?
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करुन त्याचा मृतदेह अरवलीच्या टेकड्यांमध्ये फेकण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता बऱ्याच धक्कादायक बाबी समोर आल्या.

बातम्या हायलाइट

बहिणीने लव्ह मॅरेज केलं म्हणून भावाचा संताप

संतापलेल्या भावाने दाजीलाच संपवलं...
Crime news: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक विचित्र आणि धक्कादायक मर्डर केस सोडवण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. येथे एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करुन त्याचा मृतदेह अरवलीच्या टेकड्यांमध्ये फेकण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता बऱ्याच धक्कादायक बाबी समोर आल्या. संबंधित तरुणाने प्रेमविवाह केला होता. मात्र, पीडित तरुणाच्या मेव्हण्याला ही गोष्ट अजिबात पटली नसल्याने त्याने त्याच्या मित्रांना सोबत घेऊन आपल्या दाजीचीच हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
बहिणीने लव्ह मॅरेज केलं म्हणून...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीने लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाचा प्रचंड संताप झाला आणि याच रागात त्याने त्याच्या दाजीच्या हत्येचा प्लॅन बनवला. आरोपीने आधी आपल्या साथीदारांसोबत मिळून पीडित तरुणाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याचे दोन्ही हात बांधून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा जीव जाईपर्यंत त्याचा चाकूने गळा कापला. हत्येनंतर अंसल फार्म हाऊसजवळील डोंगरात फेकून देण्यात आला. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचं सांगितलं जात आहे.
मृताच्या हातावर बायकोचं नाव
6 जुलै रोजी गुरुग्रामच्या अंसल फार्म हाऊसजवळील अरवलीच्या टेकड्यांमध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहता त्या तरुणाची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याचं स्पष्ट होत होतं. पोलिसांनी घटनास्थळावरुन हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू देखील जप्त केला आहे. तसेच, मृत तरुणाच्या हातावर त्याच्या पत्नीचं नाव गोंदवल्याचं आढळलं. यामुळे पोलिसांनी हत्येचा गुंता सोडवण्यास मदत झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सुमारे 72 तास पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवण्यात आला. मात्र, या मृतदेहाबाबत कोणीही दावा केला नसल्याने पोलिसांनी तो एक बेवारस मृतदेह मानून त्याचे अंतिम संस्कार केले.
हे ही वाचा: चोरांना पकडण्यासाठी घरमालकाने चक्क मांत्रिकालाच बोलावलं! लिंबू, मिरची अन् नारळ ठेऊन खेळ सुरु केला अन् घडलं भयंकर..
दुसऱ्या दिवशी मिळाला पुरावा
दुसऱ्या दिवशीच, म्हणजे 7 जुलै रोजी फरीदाबादच्या बल्लभगढ पोलीस स्टेशनमध्ये समीर नावाचा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तपासादरम्यान, गुरुग्राम पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी समीरच्या कुटुंबियांना संबंधित मृतदेहाचा फोटो पाठवला. त्यानंतर, तो मृतदेह समीरचाच असल्याची कुटुंबियांनी पुष्टी केली. 22 वर्षीय समीर उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील करहेडा गावाचा रहिवासी होता. तो आपल्या पत्नीसोबत बल्लभगढमध्ये राहून IMT फरीदाबाद येथील एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने काही दिवसांपूर्वी एका मुलीला पळवून नेऊन तिच्यासोबत प्रेमविवाह केला होता.
हे ही वाचा: पहिल्या पत्नीला घटस्फोट, दुसऱ्या महिलेसोबत लग्न! आता थेट तिसऱ्या नवरीच्या शोधात... स्वत:च्या मुलीची सुद्धा पर्वा...
पोलिसांनी केली आरोपींना अटक
पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तपास सुरु ठेवला. यादरम्यान, समीरच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करण्यात आली. कॉल डिटेल्समध्ये पत्नीच्या कुटुंबियांसोबत संपर्क झाल्याचं समोर आलं. यातूनच मुलीच्या घरच्यांपैकी कोणीतरी समीरची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. खोल तपासानंतर, पोलिसांनी गुरुग्राममधून महेशला तसेच, राजस्थानच्या भिवाडीमधून रामसदन उर्फ विक्की आणि त्याची पत्नी लिलादेवी यांना आणि राजस्थानच्या तिजारामधून अलीम खानला अटक केल्याची माहिती समोर आली.