15 दिवसांनंतर लंडनला जाणार होती, पण अचानक 23 व्या मजल्यावरुन उडी मारली अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई तक

मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये एका 17 वर्षीय तरुणीने गुरुवारी (14 ऑगस्ट) हायराईज इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

अचानक 23 व्या मजल्यावरुन उडी मारली अन्...
अचानक 23 व्या मजल्यावरुन उडी मारली अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील धक्कादायक घटना

point

मुलीने 23 व्या मजल्यावरुन उडी मारून टोकाचं पाऊल...

point

गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये मुलीने केली आत्महत्या

Mumbai Suicide Case: मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये एका 17 वर्षीय तरुणीने गुरुवारी (14 ऑगस्ट) हायराईज इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडितेने तिच्या घराच्या बेडरुममधील खिडकीतून उडी मारल्याचं सांगितलं जात आहे. आरे पोलिसांच्या माहितीनुसार, मृत पावलेली तरुणी एका मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपरची एकुलती एक मुलगी असून तिने नैराश्यात येऊन स्वत:चं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. घटनास्थळी कोणतीच सुसाइड नोट सापडली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडिता दोन वर्षांपासून मानसिक तणावाने ग्रस्त असून तिच्यावर यासंबंधी उपचार देखील सुरू होते.

15 दिवसांनंतर लंडनला जाणार होती... 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही 15 दिवसांनंतर पुढील शिक्षणसाठी लंडनला जाणार होती. घटनेपूर्वी पीडिता 23 मंजल्यावरील फ्लॅटमधील तिच्या रूममध्ये बसून अभ्यास करत होती. त्यावेळी तिची आई स्वयंपाकघरात तर आजी आणि आजोबा दुसऱ्या खोलीत असल्याची माहिती आहे. पीडितेचे वडील त्यावेळी कामानिमित्त बाहेर होते. अपार्टमेन्टच्या रिसेप्शनिस्टने तिला इमारतीच्या 23 मजल्यावरुन खाली पडताना पाहिलं.

मानसिक तणाव कारणीभूत 

पीडित तरुणीच्या आई-वडिलांनी म्हटल्याप्रमाणे, मानसिक तणावच तिने आत्महत्या करण्यामागचं मुख्य कारण आहे. आता आरे पोलीस पीडितेचे आई-वडील, तिच्या मैत्रिणी, शाळेतील सदस्य आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगण्यात येत आहे. पीडितेची लंडनमध्ये जाऊन तिचं शिक्षण पूर्ण करायची इच्छा असल्याचं आई-वडिलांकडून कळालं. याच कारणामुळे मागील महिन्यात ते लंडनला देखील गेले होते. आरे पोलिसांनी एडीआर दाखल करुन केसचा तपास करत असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा: बहीण गेली प्रियकरासोबत पळून! भावाचा संताप अन् दाजीला केलं किडनॅप... नंतर काय घडलं?

8 महिन्यात चौथी केस  

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मागील आठ महिन्यांमध्ये या परिसरात आत्महत्या झाल्याची ही चौथी केस आहे. यामध्ये तीन विद्यार्थी मृत पावले आहेत. आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच परिसरात 2 जुलै रोजी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. संबंधित तरुणाला दीक्षांत समारंभासाठी जर्मनीला जाण्यासाठी प्रवासाचा परवाना मिळाला नव्हता. त्यामुळे त्याला एअरपोर्टवर प्रवेश दिला गेला नाही. त्यानंतर, तो विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर आधी जुहू बीचकडे गेला. त्याठिकाणी त्याने आपलं सगळं सामान सोडलं आणि नंतर आरे कॉलनीतील त्याच कॉम्प्लेक्सच्या 42 व्या मजल्यावरुन उडी मारुन त्याने आत्महत्या केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp