"खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, खांद्यावर बंदूक ठेऊन...",मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नेमकं काय म्हणाले?
Election Commission Of India Press Conference : राहुल गांधी यांनी फेक व्होटर लिस्ट समोर आणल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत विविध आरोपांचं खंडन करून स्पष्टीकरण दिलं आहे.

बातम्या हायलाइट

राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केले होते आरोप

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिलं स्पष्टीकरण

ज्ञानेश कुमार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Election Commission Of India Press Conference : काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला धारेवर धरलं होतं. एका मतदारने अनेक ठिकाणी मतदान केल्याचा दावा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला होता. राहुल गांधी यांनी फेक व्होटर लिस्ट समोर आणल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत विविध आरोपांचं खंडन करून स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार काय म्हणाले?
ज्ञानेश कुमार पत्रकार परिषदेत म्हणाले, खोट्या आरोपांना निवडणूक आयोग आणि मतदारही घाबरत नाही. जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारताच्या मतदारांना निशाणा बनवून राजकारण केलं जात असेल, तर निवडणूक आयोग यावर स्पष्टीकरण देत आहे. निवडणूक आयोग निडर होऊन सर्व गरिब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुणांसह सर्व वर्ग आणि सर्व धर्मांच्या मतदारांसोबत कोणतंही भेदभाव न करत ठामपणे उभा होता. आताही ठामपणे उभा आहे आणि पुढेली राहील.
हे ही वाचा >> EVM मतदानाची फेरमतमोजणी, सुप्रीम कोर्टामुळे हरलेला उमदेवार जिंकला.. देशातील पहिलीच घटना प्रचंड चर्चेत
ज्ञानेश कुमार पुढे म्हणाले, राजकीय पक्षांच्या मागणीनुसारच मतदारयाद्यांची फेरतपासणी सुरु आहे. आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत. निवडणूक आयोग दोन राजकीय पक्षांमध्ये भेद करत नाही. मतदारयाद्यांच्या फेरतपासणीसाठी एक आराखडा तयार केला आहे. बिहारमधील 7 कोटीपेक्षा जास्त मतदार निवडणूक आयोगासोबत आहेत. राजकीय पक्षांनी 15 दिवसांत त्रुटी सांगाव्या. पक्षांच्या मागणीनुसारच मतदारयाद्यांची फेरतपासणी केली. मतदार यादीत सुधारणांसाठी एसआयआरची सुरुवात बिहारमधून केली. मतदरांनी स्वत: 28370 हरकती घेतल्या आहेत. निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही,
आमच्यासाठी कोणीच पक्ष-विपक्ष नाहीत. आमच्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकसमान आहेत. आमच्यासाठी कोणीही सत्ताधारी किंवा विरोधक नाही. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआरची सुरुवात केली आहे. अनेक मतदारांचे फोटो परवानगीशिवाय दाखवण्यात आले. व्होट चोरीच्या चुकीच्या शब्दांनी भ्रम पसरवणं म्हणजे संविधानाचा अपमान आहे. पारदर्शक प्रक्रियेत मतचोरी होऊ शकते का? असा प्रश्नही निवडणूक आयोगाने उपस्थित केला.