Pm Narendra Modi Speech : 'दहशतवाद्यांना पोसणारे दहशतवादीच अन्...' ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले पंतप्रधान?
Pm Narendra Modi Speech : स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण केले. तेव्हा त्यांनी देशवासियांना संबोधित करताना पहलगाममध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूर ऑपरेशनवर भाष्य केले.

बातम्या हायलाइट

आज भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण

पहलगाम हल्ल्याबाबत मोठं वक्तव्य
Pm Narendra modi : आज भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन हा संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवत देशाला संबोधित केलं. पंतप्रधान म्हणून स्वातंत्र दिनी केलेले हे मोदींचे 12 वं भाषण आहे. पंतप्रधान नेमके कोणत्या मुद्द्यांवर बोलतील याकडे अनेकांच्या नजरा होत्या. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना पाकिस्तानला धारेवर धरलं. याच मुद्द्यावरून त्यांनी 'खून और पाणी एकसाथ नही बहेगा', असं ते म्हणाले, ते नेमकं पहलगाम हल्ल्याबाबत काय म्हणाले ते पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.
ऑपरेशन सिंदूरवर मोदींचं भाषण
पहलगाममध्ये धर्म विचारून ज्यांनी आपल्या नागरिकांना गोळ्या झाडल्या त्यांना आपल्या सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत चांगलाच धडा शिकवला. मला या निमित्ताने त्यांना सॅल्युट करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा वाटतो. नंतर त्यांनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत सांगितलं की, पहलगाममध्ये काही दहशवाद्यांनी भारतात घुसून आतंकवाद्यांना त्याच्याच मातीत गाडले होते आणि याचमुळे पाकिस्तानची झोप अजूनही पूर्ण झालेली नाही, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला धारेवर धरलं.
'दहशतवाद्यांना पोसणारे दहशतवादीच...'
ते म्हणाले की, पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला होता, त्याचे अनेक गौप्यस्फोट आता होऊ लागले आहेत. या देशात दहशतवाद्यांना पोसणारे हे देखील दहशतवादीच आहेत. ते दोघेही मानवतेचे दुश्मन आहेत. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आणि दहशतवाद्यांमध्ये कसलाही फरक नाही. आता भारत न्युक्लियरच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे म्हणत नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा : Independence Day : इंग्रजांनी 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताकडे सत्ता का सोपवली? शेवटच्या 24 तासात काय काय घडलं?
'न्यूक्लिअरचं कारण सांगून ब्लॅकमेलिंग...'
आता न्यूक्लिअरचं कारण सांगून आम्हाला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार वर्षांपासून सुरु होता, पण आता तसं होणार नाही. जर दुश्मनांनी असं पाऊल उचललं तर आमचे सैनिक त्यांना चांगलंच प्रत्युत्तर देतील, असं ते भाषणात म्हणालेत. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अप्रत्यक्षरित्या वक्तव्य केलं की, खून और पाणी एकसाथ नही बहेगा, असं ते म्हणाले.