मोठी बातमी: संजय राऊतांकडून थेट सेना-मनसे युतीची घोषणा, फक्त मुंबईतच नाही, 'इथेही' होणार युती!
Sanjay Raut on Shiv Sena UBT ans Mns Yuti: शिवसेना UBT आणि मनसेची युती होणार याबाबत स्वत: संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. पाहा ते नाशिकमध्ये नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

नाशिक: मराठीच्या भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची निवडणुकीसाठी युती होणार की नाही याबाबत आतापर्यंत कोणीही उघडपणे भाष्य केलं नव्हतं. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने हेच म्हणत होते की, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. मात्र, आता पहिल्यांदाच शिवसेना (UBT) आणि मनसेच्या युतीबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती देखील शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्याकडून.
'शिवसेना-मनसेची ताकद ही फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रत आहे. त्यामुळे केवळ मुंबईतच नाही तर नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे आम्ही एकत्र लढू.' असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना केलं आहे.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी.. मुंबई तर ताकद आहेच. मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन जिंकतील. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत, ठाण्यात आम्ही एकत्र लढणार आहोत.'
हे ही वाचा>> 'ठाकरे बंधूची युती अन् मुंबई...' उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सगळंच सांगून टाकलं
'कल्याण-डोंबिवलीत आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह... जिथे आमच्या एकमेकांशी चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे.'










