Pm Modi Speech : महागाई लवकरच होणार कमी, जीएसटीच्या दराबाबत मोठा निर्णय, 'या' दिवाळीत मोठी भेट मिळणार
Pm Modi Speech : देशातील नागरिकांना दिवाळीला डबल गिफ्ट देण्याबाबत निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी जीएसटी टॅक्समुळे देशाच्या कर्जाचा बोजा खाली झाल्याचं सांगितलं. त्यांनी दिवाळीला मिळणाऱ्या गिफ्टबाबत काय सांगितलं ते समजून घेऊया.

बातम्या हायलाइट

देशाचा आज 79 वा स्वातंत्र्य दिन

पंतप्रधानांकडून ऑपरेशन सिंदूरबाबत

दिवाळीला मिळणाऱ्या गिफ्टबाबत काय म्हणाले मोदी?
Pm Modi Speech : देशाचा आज 79 वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा होताना दिसतोय. अशातच देशाच्या जनतेचे पंतप्रधानाच्या भाषणाकडे आणि भाषणातील मुद्द्यांकडे विशेष लक्ष आहे. पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले असता, त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबतही भाष्य केले. तसेच त्यांनी संबोधित करताना पाकिस्तानलाही खडेबोल सुनावले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी देशातील नागरिकांना दिवाळीला डबल गिफ्ट देण्याबाबत निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी जीएसटी टॅक्समुळे देशाच्या कर्जाचा बोजा खाली झाल्याचं सांगितलं. त्यांनी दिवाळीला मिळणाऱ्या गिफ्टबाबत काय सांगितलं ते समजून घेऊया.
हे ही वाचा : Pm Narendra Modi Speech : 'दहशतवाद्यांना पोसणारे दहशतवादीच अन्...' ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले पंतप्रधान?
दिवाळीत मिळणार डबल गिफ्ट?
पंतप्रधानांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांपासूनची करप्रणाली आम्ही स्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही उच्च अधिकारी पुनरावलोकन समितीची स्थापना केली आणि पुनरावलोकन सुरु केले. आम्ही देशातील प्रत्येक राज्यासोबत संपर्कात आहोतच. आम्ही पुढील पिढीतील जीएसटीच्या करप्रणालीत सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या दिवाळीत तुमच्यासाठी ही भेट असेल, असं ते म्हणालेत.
'लघु उद्योगांना सर्वाधिक फायदा'
ते पुढे म्हणाले की, दिवाळीतील या मिळणाऱ्या गिफ्टमुळे सामान्य माणसांच्या गरजांनुसार करांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल. याचा सर्वाधिक फायदा हा एमएएमई या लघु उद्योगांना होणार आहे. तसेच दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. त्यातून अर्थव्यवस्थेलाही एक नवीन चालना मिळणार आहे.
हे ही वाचा : LIVE Independence day PM Modi Speech: ‘दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या झाडल्या’, लाल किल्ल्यावरून PM मोदींचं घणाघाती भाषण
त्यानंतर त्यांनी सेमीकंडक्टरचा उल्लेख करताना म्हणाले की, आपण मशिन मोडमध्ये सेमीकंडक्टरवर काम करत आहोत. 6 सेमीकंडक्टर युनिट्सची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वर्षाच्या शेवटी मेड इन इंडिया चिप्स बाजारात उपलब्ध होतील. हे भारताचे शक्तीशाली नवीन युग आहेत.