मोठी बातमी: बच्चू कडूंना 'ते' प्रकरण अखेर भोवलं, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा!
माजी आमदार बच्चू कडू यांना आयएएस अधिकाऱ्यावर हल्ल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी आता कोर्टाने त्यांना शिक्षा देखील सुनावली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: माजी मंत्री आणि आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश बबनराव कडू यांना 2018 साली IAS अधिकाऱ्यावर हल्ला आणि धमकी दिल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी शिक्षा सुनावताना सांगितले, "शिक्षेचा उद्देश केवळ आरोपीला समज देणे हा नाही, तर भविष्यातील संभाव्य चुकीच्या कृत्यांना आळा घालणे हा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा आदर राखला जावा आणि तक्रारींसाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जावा."
तथापि, कडू यांच्या विनंतीवरून त्यांची शिक्षा अपील दाखल करण्यासाठी स्थगित करण्यात आली आणि त्यांना जामीन मंजूर झाला.
बच्चू कडू यांच्यावर IPC च्या कलम 353 (सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये ते दोषी ठरले. मात्र, कलम 504 (जाणीवपूर्वक अपमान) अंतर्गत त्यांची निर्दोष मुक्तता झाली.










