किशोरवयीन मुलीला खोलीत नेत केले सामूहिक अत्याचार, डोळ्यावर इतकं मारलं की काहीही दिसेना
crime news : दोन तरुणांनी रविवारी एका किशोरवयीन मुलीवर हैवानी कृत्य केलं. शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आहे. आरोपींनी मुलीच्या डोळ्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या डोळ्याला इजा झाली असून तिला काही दिसेनासे झाले आहे,
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन तरुणांनी तिला एका खोलीत नेलं अन् बंद दराआड...
जबाबाच्या आधारे एफआरआय नोंदवला
Crime news : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रविवारी दोन तरुणांनी एका किशोरवयीन मुलीवर हैवानी कृत्य केलं. शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आहे. या घटनेबाबत मुलीच्या आईने सांगितलं की, तिची मुलगी घरातच होती. याच घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा सवाल, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण VIDEO
दोन तरुणांनी तिला एका खोलीत नेलं अन् बंद दराआड...
दोघांनी मिळून मुलीला एका खोलीत नेत बंद खोलीत दरवाजा बंद करून लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आरोप करत लैंगिक अत्याचार केला. नंतर तिने प्रतिकार करत तिला मारहाण केली. या मारहाणीनंतर तरुणीच्या डोळ्याला मुक्कामार लागला होता, या हल्ल्यात पीडितेच्या डोळ्यांना अंधुकपणा आला.
हे ही वाचा : शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट नजर, विद्यार्थ्यांना बाहेर पाठवून शिकवणीच्या बहाण्याने बंद दाराआड...
जबाबाच्या आधारे एफआरआय नोंदवला
शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रवीण कुमार प्रभाकर यांनी सांगितलं की, संबंधित घटना ही प्रेमप्रकरणातून घडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. जबाबाच्या आधारे या प्रकरणी एफआरआय देखील नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणात पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. महिला आणि मुलींवर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.










