'कैसा हराया' फेम नगरसेविका सहर शेख यांचा माफीनामा, किरीट सोमय्यांची माहिती; 'ते' वक्तव्य भोवलं
Sahar Shaikh Apology : 'कैसा हराया' फेम नगरसेविका सहर शेख ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर केलेल्या विजयाच्या भाषणात मुंबईला हिरवी करु असं चिथावणीखोर विधान तिनं केलं होतं. तिच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची तक्रार भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याविषयी तिनं माफी मागितली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'कैसा हराया' फेम नगरसेविका सहर शेख यांचा माफीनामा
किरीट सोमय्यांची माहिती
Sahar Shaikh Apology : मुंब्रा येथील एमआयएमची नवनिर्वाचित तरुण नगरसेविका सहर शेख ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर केलेल्या विजयाच्या भाषणात संपूर्ण मुंब्रा हिरवा करु असं चिथावणीखोर विधान तिनं केलं होतं. तिच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची तक्रार भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर सहर शेख हिनं आपल्या वक्तव्याविषयी लेखी स्वरुपात माफी मागितल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
हे ही वाचा : ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल, सत्ताधाऱ्यांनी पळवल्याचा दावा, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
'भारताच्या तिरंग्यासाठी आयुष्यभर काम करणार'
नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर केलेल्या विजयाच्या भाषणात सहर शेख ही 'कैसा हराया' असं म्हणत चर्चेत आली होती. यावेळी तिनं मुंबई हिरवी करु असं वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यानं चांगलीच खळबळ माजली. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी तिला दोनदा बोलावलं होतं. यानंतर आता सहरनं लेखी स्वरुपात माफी मागितली आहे. यामध्ये तिनं लिहिलं आहे की, 'कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. याबद्दल मी माफी मागते. माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे, मात्र भारताच्या तिरंग्याची मी आयुष्यभर काम करत राहीन.'










