इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका थेट LPG गॅस सिलिंडरवर, 25 दिवसांपूर्वी संपला तर काय करावं?
LPG Gas cylinder : इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या भडक्याचा परिणाम हा देशातील गॅस सिलिंडरवर होताना दिसतोय. देशांमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे जागतिक तेल आणि वायु बाजारात अनिश्चितता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात, एलपीजी पुरवठा आणि किंमतीबाबतही बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकाने गॅस सिलिंडरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिलिंडर बुकींगसाठी 25 दिवसांचा कालावधी वाढवला
25 दिवसांपूर्वी सिलिंडर संपला तर काय करावं?
LPG Gas cylinder : इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या भडक्याचा परिणाम हा देशातील गॅस सिलिंडवर होताना दिसतोय. देशांमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे जागतिक तेल आणि वायु बाजारात अनिश्चितता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात, एलपीजी पुरवठा आणि किंमतीबाबतही बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकाने गॅस सिलिंडरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : जालन्यात साडीच्या सहाय्याने तरुणाने गळफास घेत स्वत:ला संपवलं, मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस
सिलिंडर बुकींगसाठी 25 दिवसांचा कालावधी वाढवला
याआधी ग्राहक गॅस ,सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर 21 दिवसानंतर नवीन सिलिंडर बुक करू शकत होते. पण, आता याच कालावधीत बदल झाला आहे. सिलिंडर बुक करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी वाढवण्यात आला. या बदलाचा महत्त्वाचा उद्देश असा की, गॅस सिलिंडरची साठवणूक रोखणे आणि संतुलित पुरवठा रोखणे असा आहे.
अनेक घरांमध्ये गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब अशी की, 25 दिवसांपूर्वी सिलिंडर संपला असेल तर नेमकं काय होईल? अशा स्थितीत ग्राहकांसाठी वेगवेगळे पर्याय आहेत.
हे ही वाचा : फेमस रील स्टार अरुण तुपेचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ, घरातच मृतावस्थेत आढळला
25 दिवसांपूर्वी सिलिंडर संपला तर काय करावं?
समजा 25 दिवसांआधीच गॅस संपल्यास नेमकं करावं काय? असा प्रश्न उपस्थित होतो. सरकारने नियमाबाबत सांगितलं की, ग्राहकांनी थेट त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जावे आणि आपली परिस्थिती स्पष्ट करावी. अनेकदा विशेष एजन्सी परवानगीच्या आधारे बुकींग देतात. आपत्कालीन परिस्थितीत देखील तुम्ही अतिरिक्त शुल्कासाठी सिलिंडर मिळवू शकता, तसेच दोन सिलिंडरचे कनेक्शन देखील घेता येईल.










