जालन्यात साडीच्या सहाय्याने तरुणाने गळफास घेत स्वत:ला संपवलं, मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस

मुंबई तक

Jalna news : जालन्यात साडीच्या सहाय्याने गळफास घेत तरुणानं जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव राजेश प्रकाश चव्हाण (वय 40) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ते जालना शहरातील कन्हैयानगर परिसरातील रहिवाशी होते. दरम्यान या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

ADVERTISEMENT

Jalna news
Jalna news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

साडीच्या सहाय्याने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल

point

घराचा दरवाजा उघडून पोलिसांनी तपास केला

Jalna news : विजय साळी - जालन्यात साडीच्या सहाय्याने गळफास घेत तरुणानं जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव राजेश प्रकाश चव्हाण (वय 40) असे आहे. राजेश चव्हाण हे जालना शहरातील कन्हैयानगर परिसरातील रहिवाशी होते. दरम्यान या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. 

हे ही वाचा : 'काहीही करू नकोस, आपल्या मुलीची काळजी घे मित्रा...' लग्नाचा वाढदिवस साजरा करून बायकोनं संपवलं जीवन

साडीच्या सहाय्याने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल

घडलेल्या घटनेनुसार, दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचे कुटुंब बाहेरगावी लग्नासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान दोन ते तीन दिवसांत घर बंद असल्याने दुर्गंधी येऊ लागली असा संशय व्यक्त करण्यात आला. याबाबत नागरिकांनी तात्काळ चंदनझिरा पोलिसांना माहिती दिली. 

संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून तपास केला असता, राजेश चव्हाणचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर मृतदेह खाली काढून शवविच्छेदनासाठी शासकिय रुग्णालयात पाठवला होता. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

हे ही वाचा : शेतात जातो असे सांगून अल्पवयीन मुलगा घरी परतला नाही, 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मृतदेह नाल्यात आढळला

या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमल्याचे वृत्त होते. मृतदेह आढळल्यानंतर शेजाऱ्यांनी बाहेरगावी गेलेल्या मृताच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp