'काहीही करू नकोस, आपल्या मुलीची काळजी घे मित्रा...' लग्नाचा वाढदिवस साजरा करून बायकोनं संपवलं जीवन
Crime News : लग्नाचा वाढदिवस साजरा करून महिलेनं 24 तासांतच जीवन संपवलं. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव प्रियांका (वय 23) असे होते. महिलेनं केलेल्या आत्महत्येनंतर घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली होती, ज्यात तिने तिच्या पतीला त्यांच्या लहान मुलीची काळजी घेण्याची विनंती देखील केली. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वहिनी घरी परतताच मृतदेह लटकलेल्या स्वरुपात आढळला
सुसाईड नोटमध्ये काय?
Crime News : लग्नाचा वाढदिवस साजरा करून महिलेनं 24 तासांतच आपलं जीवन संपवलं. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव प्रियांका (वय 23) असे होते. महिलेनं केलेल्या आत्महत्येनंतर घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली होती, ज्यात तिने तिच्या पतीला त्यांच्या लहान मुलीची काळजी घेण्याची विनंती देखील केली. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा : फेमस रील स्टार अरुण तुपेचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ, घरातच मृतावस्थेत आढळला
वहिनी घरी परतताच मृतदेह लटकलेल्या स्वरुपात आढळला
घडलेल्या घटनेनुसार, उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील अजमतूर गावातील रहिवासी प्रियांकाचे एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. शनिवारी त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा केला. रविवारी दुपारी घरातील पुरुष कामावर गेले आणि महिला शेळ्या चारायला गेल्या होत्या. त्याचदरम्यान प्रियांकाने तिच्या खोलीत साडीने गळफास घेत जीवन संपवलं. वहिनी घरी परतल्यानंतर तिला तिची दीड महिन्यांची मुलगी रडताना दिसली होती. तिने पाहिल्यानंतर प्रियांकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
सुसाईड नोटमध्ये काय?
पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना एक सुसाईड नोट आढळून आली होती. प्रियांकाने त्यात लिहिलं होतं की, 'माझ्या प्रिय मुलीची काळजी घे. मला काहीही समजत नाही आणि तु काहीही करू नकोस, मुलीची काळजी कोण घेईल? आनंदाने जग, माझ्या मित्रा. ठीक आहे, बाय'. तिने चिठ्ठीच्या शेवटी 'बाबूजी' असेही लिहिले, ज्याचा पोलीस तपास करत आहेत.
आई-वडील आणि सासरच्या मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप
या घडलेल्या घटनेनंतर प्रियांकाच्या आई-वडील आणि सासरच्या मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मृताची आई गीताने आरोप केला की, प्रियांकाला बाईक आणि सोन्याची साखळी तसेच हुंड्यासाठी त्रास देण्यात आला होता आणि नंतर हत्या केली. प्रियांका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि तणावाखाली जगत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचललं.










