मित्राच्या बायकोवर जडला जीव, शेवटी केलं कांड
एका ट्रक चालकाच्या हत्येचे गूढ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उकलले आहे. मित्राच्या पत्नीला मिळवण्याच्या इच्छेतून एका व्यक्तीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ट्रक चालकाच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मित्राच्या बायकोवर जडला जीव
शेवटी केलं कांड
Crime News : गुजरातच्या गांधीनगरमध्ये एका ट्रक चालकाच्या हत्येचे गूढ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उकलले आहे. मित्राच्या पत्नीला मिळवण्याच्या इच्छेतून एका व्यक्तीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ट्रक चालकाच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींनी आधी त्याला दारू पार्टीचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले आणि नंतर चालत्या कारमध्ये गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली. पेथापूर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत तीनही आरोपींना अटक केली आहे.
मित्रानेच केली हत्या
मगनजी ऊर्फ मनोज ठाकोर (वय 36) असे मृत ट्रक चालकाचे नाव असून तो या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी पायल, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार लाला ठाकोर हा गांधीनगर महानगरपालिकेत कार्यरत असून, तो मगनजीचा अत्यंत जवळचा मित्र होता. त्याच्यासोबत पोलिसांनी सुरेश डाभी आणि दिग्विजय ऊर्फ पिंटू चौहान या इतर दोन साथीदारांनाही बेड्या ठोकल्या आहेत. लाला याचे मगनजीच्या घरी नेहमी जाणे-येणे होते आणि याच दरम्यान तो त्याची पत्नी पायल हिच्याकडे आकर्षित होऊन तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता.
हे ही वाचा : लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणारा प्रकार
अशी केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी मगनजी कामावर गेला होता, पण त्यादिवशी काम नसल्याने तो घरी परतत होता. याच संधीचा फायदा घेत लाला ठाकोरने पूर्वनियोजित कटानुसार त्याला दारू पार्टीसाठी बोलावले. आरोपींनी अहमदाबादवरून 24 तासांसाठी भाड्याने आणलेल्या कारमध्ये मगनजीला पुढच्या सीटवर बसवले. यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या आरोपींनी आधीच विकत घेतलेल्या स्कार्फच्या साहाय्याने त्याचा गळा आवळला. हत्या केल्यानंतर त्यांनी मगनजीचा मृतदेह रांधेजा गावाच्या बाहेरील एका निर्जन शेतात फेकून दिला. संध्याकाळी मगनजीचा चुलत भाऊ राहुल याला त्याचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली व शवविच्छेदन अहवालात मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा : तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अखेर विद्यार्थ्याने नको तेच.. भयंकर घडलं
पायलचा सहभाग?
याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून तीनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी पायलला मिळवण्यासाठी आणि मगनजीला कायमचे मार्गातून हटवण्यासाठी हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सध्या तिन्ही आरोपींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, या हत्येच्या कटात मगनजीची पत्नी पायल हिचा काही सहभाग होता का किंवा तिला या कटाची काही पूर्वकल्पना होती का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. तपासादरम्यान पायलच्या सहभागाचे पुरावे आढळल्यास तिच्यावरही गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









