तृतीयपंथी भावाला भेटायला गेली अन् घडलं भयानक, 16 वर्षीय मुलगी रस्त्याकडेला...

मुंबई तक

एका 43 वर्षीय कार चालकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अमली पदार्थ देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

तृतीयपंथी भावाला भेटायला गेली अन् घडलं भयानक,

point

16 वर्षीय मुलगी रस्त्याकडेला...

Crime News : एका 43 वर्षीय कार चालकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अमली पदार्थ देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सुगावा लागताच संतप्त झालेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. पीडित मुलगी दोन भाऊ आणि दोन बहिणींसह राहते, ज्यापैकी एक तृतीयपंथी आहे. पीडिता आपल्या याच तृतीयपंथी भावंडाला भेटण्यासाठी गेली होती. तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये बुधवारी (3 जून) संध्याकाळी ही घटना घडली.

कारमधून फिरायला नेले अन्...

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीची ओळख एस. मारीसेल्वन (वय 43) अशी झाली असून तो कार चालक आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारीसेल्वन हा 'भाग्या' नावाच्या एका ट्रान्सवुमनला सोडण्यासाठी कार घेऊन त्या ठिकाणी आला होता. दरम्यान, संध्याकाळ 5 वाजण्याच्या सुमारास मारीसेल्वन याने पीडित अल्पवयीन मुलीला कारमधून फिरवून आणण्याच्या बहाण्याने सोबत घेतले. प्रवासादरम्यान त्याने तिला पिण्यासाठी ज्यूस दिला, ज्यामध्ये अमली पदार्थ मिसळण्यात आले होते. हा ज्यूस पिल्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. याचाच गैरफायदा घेत मारीसेल्वनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत टाकून तिथून पळ काढला.

हे ही वाचा : 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?

नातेवाईकांनी केली मारहाण

पीडित मुलगी बेशुद्ध पडल्याची माहिती तिच्या एका बहिणीला मिळाली. तिने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली आणि तिला उपचारासाठी त्रिची येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे, मारीसेल्वनने आपल्या बहिणीवर अत्याचार केल्याचे समजताच पीडितेच्या दुसऱ्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी तात्काळ आरोपीचा शोध घेतला. त्यांनी मारीसेल्वनला पकडून आणले आणि त्याची चांगलीच धुलाई केली. या मारहाणीत मारीसेल्वन गंभीर जखमी झाला असून त्यालाही उपचारासाठी त्रिची शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर संतप्त झालेले कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर एकत्र येत तीव्र निदर्शने केली आणि आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

हे ही वाचा : परदेशातून आलेल्या बापाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, सलग तीन दिवस काय घडलं?

सामूहिक बलात्कार नाही

पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहितेचे कलम 87, पॉक्सो (POCSO) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, काही प्रसारमाध्यमांनी या घटनेत मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, त्रिची शहर पोलिसांनी गुरुवारी या वृत्ताचे खंडन करत स्पष्टीकरण दिले की, या गुन्ह्यात केवळ मारीसेल्वन हा एकच आरोपी सामील होता आणि सामूहिक बलात्काराची कोणतीही घटना घडलेली नाही.
 

हे वाचलं का?