'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?
कौटुंबिक हिंसाचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष सशस्त्र दलात तैनात असलेल्या एका पोलीसाने आपल्याच पत्नीवर क्रूर अत्याचार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तू उशीरा का आलीस?
हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...
धक्कादायक प्रकरण
Crime News : कौटुंबिक हिंसाचाराचे एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारे प्रकरण समोर आले आहे. 'एसएएफ'मध्ये (विशेष सशस्त्र दल) तैनात असलेल्या एका पोलीसाने आपल्याच पत्नीवर क्रूर अत्याचार केला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने आधी तिला बेदम मारहाण केली आणि नंतर तिचे हात-पाय बांधून गरम इस्त्रीने शरीरावर अनेक ठिकाणी चटके दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील ही घटना आहे.
बायकोवर संशय
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आरक्षक राजेंद्र परिहार याचे लग्न साधारण तीन वर्षांपूर्वी झाले होते. राजेंद्र हा अनेकदा आपली पत्नी पूजा परिहार हिच्यावर विनाकारण संशय घ्यायचा आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरात वाद घालायचा, असा आरोप आहे. या संशयी स्वभावातूनच त्याने पत्नीसोबत हे अमानुष कृत्य केले.
हे ही वाचा : नागपूर : ‘मम्मी-पप्पा सॉरी..’, मी पुन्हा NEET..,स्नेहासोबत काय घडलं?
तू उशीरा का आलीस?
घटनेच्या रात्री जेवण झाल्यानंतर पूजा सरकारी निवासस्थानाच्या आवारात बाहेर फिरण्यासाठी गेली होती. यादरम्यान ती खाली उपस्थित असलेल्या काही महिलांशी बोलू लागली, ज्यामुळे तिला घरी परतण्यास थोडा उशीर झाला. ती घरात परत आल्यानंतर पतीने तिला उशिरा येण्याचे कारण विचारले. मात्र, पत्नीने दिलेल्या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही आणि त्याने पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगितलं, अन्..भयंकर घडलं!
अशी केली स्वत:ची सुटका
यानंतर रागाच्या भरात आरोपीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली आणि तिचा मोबाईल फोनही तोडून टाकला. एवढ्यावरच न थांबता त्याने पूजाचे हात-पाय बांधले आणि तिला जमिनीवर पाडून गरम इस्त्रीने तिच्या शरीराच्या विविध भागांवर अनेक वेळा चटके दिले. पीडिता वेदनेने विव्हळत होती, तरीही आरोपीचा राग शांत झाला नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी महिलेने कशाबशा पद्धतीने आपले माहेर गाठले आणि कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









