समजून घ्या: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडीत नेहरूंचा रेकॉर्ड खरंच मोडला?

अनुजा धाक्रस

PM Modi 12 Year Tenure: पंडीत जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला असा दावा भाजपकडून आता केला जात आहे. पण हा रेकॉर्ड खरंच मोडला गेला आहे का? जाणून घ्या याचविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

samjun ghya anuja dhakras pm narendra modi really broken pandit nehrus record modi government congress bjp
PM मोदींनी नेहरूंचा विक्रम मोडीत काढला?
google news

नवी दिल्ली: बरोबर एक वर्षापूर्वी इंदिरा गांधींचा आणि आता पंडीत जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला. मोदींसाठी हे रेकॉर्ड मोडणं कशा अर्थाने महत्वाचं आहे, नेहरू आणि गांधींचा किती दिवसांचा रेकॉर्ड होता आणि तो खरंच मोदींनी मोडला असं म्हणता येईल का? हेच आपण समजून घेऊया.

पं. नेहरूंचा पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड PM मोदींनी कसा मोडला?

भारताचे पहिले पंतप्रधान झाले पंडीत जवाहरलाल नेहरू. 1947 ला देश स्वतंत्र झाला तेव्हाच नेहरू भारताचे पंतप्रधान झाले. 1947 पासून ते मृत्यूपर्यंत म्हणजेच 1964 पर्यंत नेहरू भारताचे पंतप्रधान राहिले, म्हणजेच एकूण आणि सलग 17 वर्ष नेहरू पंतप्रधान होते, पण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले असले तरी अजून त्यांचा 17 वर्षांचा कार्यकाळ झालेला नाही. मोदींचा कार्यकाळ हा सद्या 12 वर्षांचा आहे, 2014 ते 2026. त्यामुळे या अर्थाने बघायला गेलं तर मोदींनी अजून नेहरूंचा रेकॉर्ड मोडलेला नाही. आणि ही माहिती सरकारी वेबसाईट प्रधानमंत्री संग्रहालयावरूनच तुम्हाला सांगतो आहोत, मनातलं नाही! 

असो, पण हे वास्तव असूनही का भाजपकडून मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याचं सांगितलं जात आहे, तर त्याचं कारण नेहरू जेव्हा 1947 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा ते जनतेतून निवडून आलेले नव्हते. पारतंत्र्यातून स्वतंत्र झालेल्या भारताची तेव्हा कोणतीही राज्यघटना नव्हती, निवडणुका कशा होणार, पंतप्रधान कसे निवडले जाणार ह्याची कोणतीही रूपरेषा नव्हती, आपली घटना तयार झाली 1950 मध्ये आणि त्यानंतर नेहरू खऱ्या अर्थाने 1952 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांमधून निवडून आले, पुढे पंतप्रधान झाले. यानुसार नेहरू आणि मोदींच्या कार्यकाळाची तुलना करायची झाली तर

  • पंडीत जवाहरलाल नेहरू- 13 मे, 1952 ते 27 मे, 1964 =  म्हणजे 4,398 दिवस
  • नरेंद्र मोदी- 26 मे, 2014 ते 10 जून, 2026 = म्हणजे 4,399 दिवस. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधींचाही सलग जास्त काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम 2025 मध्ये मोडून काढला आहे.

हे वाचलं का?