'चल आईस्क्रीम खाऊया..' 6 वर्षीय पुतणीला चुलता घेऊन गेला अन्...

मुंबई तक

एका सहा वर्षांच्या निष्पाप बालिकेवर तिच्याच सख्ख्या चुलत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईस्क्रीमचे आमिष दाखवून आरोपीने हा अत्याचार केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

'चल आईस्क्रीम खाऊया..'

point

6 वर्षीय पुतणीला चुलता घेऊन गेला अन्...

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षांच्या निष्पाप मुलीवर तिच्याच सख्ख्या चुलत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (3 जून) दुपारी घडला. आरोपीने पीडित मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले आणि त्यानंतर हे पाशवी कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील ही घटना आहे.

घरी कुणीच नसताना गाठले

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून सध्या ते तुरुंगात आहेत. बुधवारी दुपारी तिची आई पतीच्या न्यायालयीन सुनावणीसाठी गेली होती, त्याचवेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून शेजारीच राहणाऱ्या नराधम चुलत्याने मुलीला गाठले. सायंकाळी आई घरी परतल्यानंतर घाबरलेल्या चिमुरडीने आपल्यासोबत घडलेला हा सर्व धक्कादायक प्रकार आईला सांगितला.

हे ही वाचा : स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...

आईनेच दाखल केली तक्रार

मुलीच्या आईने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा नोंदवला असून पीडितेला संजय गांधी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. डॉक्टरांनी मुलीला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले असून तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी, या घटनेमुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा : जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकानंच..., नेमकं काय घडलं?

वडील आणि चुलत्यामध्ये जुने वैमनस्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडितेचे वडील हे सख्खे भाऊ असून दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये जुने वैमनस्य असल्याचेही समोर आले आहे. पोलीस निरीक्षक निशा मिश्रा यांनी सांगितले की, आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, अशा घृणास्पद कृत्यामुळे समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

हे वाचलं का?