दारू पिऊन पोरगा फुल्ल टाईट, 'त्या' कारणावरून आईवर... भयंकर

मुंबई तक

Crime News : कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात विटेने हल्ला करत संपवलं. संबंधित तरुण हा दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली. त्याच तरूणाने केलेल्या कृत्याने परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

दारूच्या नशेत तरुणानं आईला संपवलं 

point

दारूच्या नशेच लेकानं विटेनं केला हल्ला 

Crime News : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात विटेने हल्ला करत संपवलं. संबंधित तरुण हा दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली. त्याच तरूणाने केलेल्या कृत्याने परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं घटनास्थळावर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : सोलापूर: पुतण्याने काकाला परस्त्री सोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, काकानं मुलासोबत...

दारूच्या नशेत तरुणानं आईला संपवलं 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची ओळख राधाचरण (वय 35) असल्याचे सांगण्यात येते. तो रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरी दारूच्या नशेतच होता. नंतर घरात लहान बहीण गुडियावरून काही कारणावरून कौटुंबिक वाद निर्माण झाला. बघता बघता वाद वाढला आणि घरातील वातावरण तणावपूर्ण झालं. 

दारूच्या नशेच लेकानं विटेनं केला हल्ला 

जेव्हा वाद वाढत गेला तेव्हा आई रामरती (वय 75) ही भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावली होती. तिने दोघांनाही शांत राहण्यास समजूत देखील काढली. नशेत असलेल्या लेकाने आईवर हल्ला केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आधी आईला जमिनीवर पाडलं, नंतर विटेने तिच्यावर हल्ला केला. 

हल्ला केल्यानंतर वृद्ध आईने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत प्रकरण समजून घेतलं.  संबंधित प्रकरणातील सहयक पोलीस अधीक्षक अधिकारी मेविस टाक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, वृद्ध महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे वाचलं का?