अनैतिक संबंधाला चटावलेल्या बायकोने 54 वर्षाच्या नवऱ्याला संपवलं, तेही भलत्याच पद्धतीने...
जलसंपदा विभागातील अभियंता लक्ष्मण मंडलेंच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. रस्ते अपघात वाटणारी ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

कराड: मुंबईहून घरी परतणारा एक सरकारी अभियंता, पहाटेची वेळ.. निर्जन रस्ता आणि काही क्षणांत झालेला एक भीषण अपघात. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं, ही एक दुर्दैवी दुर्घटना आहे. पण पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं, मोबाइल लोकेशन बघितलं आणि एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येऊ लागले. या तपासाने उघड केला एक असा कट ज्याने सगळेच हादरून गेले. कारण या कटात सामील होते ते म्हणजे त्या व्यक्तीची बायको आणि तिचा प्रियकर... अत्यंत थंड डोक्याने पतीच्या हत्येसाठी रचलेला कट जेव्हा समोर आला तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला.
नेमकी घटना काय?
कराडमधील अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या मृत्यूमागचा थरार नुकताच उघडकीस आला आहे. 54 वर्षीय लक्ष्मण श्रीरंग मंडले हे जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 6 जूनच्या पहाटे ते मुंबईहून कराडमध्ये परतले होते. सकाळी साधारण 5 वाजून 20 मिनिटांनी ते ट्रॅव्हल्स बसमधून उतरले आणि घराच्या दिशेने निघाले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी नजर आहे.
दरम्यान, सुपर मार्केट परिसरात ते पोहोचताच मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली. क्षणात सर्व काही संपलं, लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा एक केवळ अपघात वाटत होता. पण तपास सुरू झाल्यानंतर काही गोष्टी पोलिसांच्या नजरेत खटकू लागल्या. मग सुरू झाला तांत्रिक तपास.
हे ही वाचा>> नवरा बायकोच्या हनिमूनला नणंद, सासू-सासरे गेले; बायको रागवली अन्..
CCTV फुटेज, मोबाइल लोकेशन, फॉरेन्सिक पुरावे आणि डिजिटल ट्रेल... या सगळ्यांचा माग घेत पोलीस एका अशा सत्यापर्यंत पोहोचले, ज्याने संपूर्ण प्रकरणाचं स्वरूपच बदलून टाकलं. तपासात समोर आलं की, मृतकाची पत्नी सारिका मंडले हिचे 2023 पासून प्रथमेश थोरात नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. याच नात्यातून पुढे एका कटाचा जन्म झाला.









