Gen Z चा विषय लय हार्डए! आता 'या पोरांची' तर सरकारलाही धास्ती!

रोहित गोळे

'रील्सवाली पिढी' म्हणून हिणवली जाणारी Gen Z जंतर-मंतरवर आंदोलनाची नवी पटकथा लिहित आहे. जाणून घ्या ही नवी पिढी भारतातील जनआंदोलनांचा चेहरामोहरा नेमका कसा बदलत आहे.

ADVERTISEMENT

gen z is on a whole new level even government has started to feel intimidated by youth of this new generation
Gen Z Protest
Google CTA

"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव...
अंग झाडुनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव"

शाहीर अण्णा भाऊ साठेंच्या या ओळी केवळ कविता नाहीत, तर अन्यायाविरोधात उभं राहण्याची घोषणाए. अण्णा भाऊ म्हणतात, समाजात बदल हवा असेल तर अन्यायाला प्रश्न विचारावा लागतो, संघर्ष करावा लागतो.. कारण शांत बसून परिवर्तन घडत नाही.

आता सध्याच्या नव्या पिढीला आपण काय-काय नावं ठेवली? तर रील्सवाली पिढी, मोबाइलमध्ये हरवलेली पोरं, यांना संघर्ष काय असतो, हे काय कळणार?

पण... दिल्लीच्या जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांत जे घडतंय.. ते पाहिल्यानंतर एक गोष्ट डोक्यात घट्ट रुतून बसली आहे. ती म्हणजे Gen Z चा विषयच लय हार्डए! कारण ही पिढी ना कुणाच्या आदेशावर चालते, ना कुणाच्या भीतीने मागे हटते, ना लाठी खाल्ल्यानंतर घरी बसते. याउलट लाठी मारणाऱ्या पोलिसांनाच जेवण आणि फुलंही देते! हा विरोध आहे की आंदोलनाचा नवीन चेहरा? हेच आपण आज समजून घेऊया.