'डोळा वाचेल की नाही... शरीरावर भयंकर वळ अन् पॅलेट गनचा मारा...', 'त्या' पोराला राहुल गांधींनी आणलं समोर!

मुंबई तक

Rahul Gandhi Press Conference use of pellet gun against student : विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi Press Conference use of pellet gun against student
Rahul Gandhi Press Conference use of pellet gun against student
Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोळ्याला गंभीर इजा, शरीर पाहू वाटणार नाही,

point

पॅलेट गनचा मारा झेललेल्या विद्यार्थ्याला राहुल गांधींनी समोर आणलं

Rahul Gandhi Press Conference use of pellet gun against student : विद्यार्थ्यांवर चालवण्यात आलेल्या पॅलेट गनचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारने कोणतीही पॅलेट गन वापरण्यात आली नसल्याचा दावा केला असला तरी, जखमी विद्यार्थ्याला माध्यमांसमोर उभे करून राहुल गांधी यांनी त्याच्या डोळ्याला झालेली दुखापत दाखवत सरकारचा दावा फेटाळला. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. "हे भारताचे भविष्य आहे आणि अशा हजारो विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आली," असे ते म्हणाले.

हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यावर पॅलेट गनचा वापर?

राहुल गांधी यांनी सांगितले की, हे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विद्यार्थ्यांनी पोलीस भरती परीक्षेसाठी अनेक वर्षे मेहनत घेतली होती. मात्र नंतर त्यांना पेपर फुटल्याची माहिती देण्यात आली. "ज्यांच्याकडे 60 ते 70 लाख रुपये होते त्यांनी पेपर विकत घेतला आणि इतर विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले," असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कष्टाने पैसा खर्च करून त्यांना संधी दिली, पण सरकारने त्यांच्या भविष्यावरच आघात केल्याचे राहुल गांधी म्हणाले. सरकारने या प्रकरणात खोटे बोलणे थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?