मुंबईची खबर : बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनला FDA चा दणका! 50 हजारांचा दंड, कारण काय?
बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा अभाव असल्याचे तपासणीत उघडकीस आल्यानंतर कॅन्टीन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनला FDA चा दणका!
50 हजारांचा दंड
कारण काय?
Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये दुधाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गुरुवारी (23 जुलै) हे कॅन्टीन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा अभाव असल्याचे तपासणीत उघडकीस आल्यानंतर प्रशासनाकडून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पाच तास तपासणी
खाद्यपदार्थ आणि सार्वजनिक आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांचे पालन होत आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी एफडीएच्या सुरू असलेल्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातील कॅन्टीनची जवळपास पाच तास कसून तपासणी केली. त्यानंतर कॅन्टीन चालवणारे 'कमल कॅटरर्स' यांना नोटीस बजावत कॅन्टीनचे सर्व कामकाज तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले.
हे ही वाचा : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत सर्वात मोठी अपडेट, पाहा सरकारने CJP ला नेमकं सांगितलं तरी काय
50 हजार रुपयांचा दंड
दुधात माशी आढळल्याच्या तक्रारीनंतर या तपासणीला सुरुवात झाली होती. तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांनी कॅन्टीनमधील एकूण स्वच्छता, अन्न हाताळण्याच्या पद्धती आणि सुरक्षा नियमांचे पालन या सर्व बाबींची सविस्तर पाहणी केली. या कारवाईसोबतच, मुंबई महापालिकेच्या आरोग्य आणि कामगार विभागानेही कॅन्टीन चालकावर कारवाईचा बडगा उगारला असून, तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटींसाठी 'कमल कॅटरर्स'ला सुमारे 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हे ही वाचा : 'डोळा वाचेल की नाही... शरीरावर भयंकर वळ अन् पॅलेट गनचा मारा...', 'त्या' पोराला राहुल गांधींनी आणलं समोर!
पुढील आदेशापर्यंत कॅन्टीन बंद
सध्या एफडीएने हे कॅन्टीन सील केले असून, जोपर्यंत सर्व त्रुटी दूर केल्या जात नाहीत आणि अन्न सुरक्षेच्या आवश्यक मानकांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत कामकाज बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक संस्थांमध्ये चालवल्या जाणाऱ्या उपाहारगृहांमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी राबवल्या जाणाऱ्या व्यापक मोहिमेचा हा एक भाग असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत आणि अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी मिळेपर्यंत हे कॅन्टीन आता बंदच राहणार आहे.
