Personal Finance: महाराष्ट्रातील टॉप 10 जागा.. 'इथे' फ्लॅट खरेदी केल्यानंतर मिळेल जबरदस्त पैसा!
Top 10 Investment-Worthy Areas in Maharashtra: महाराष्ट्रातील टॉप 10 गुंतवणूक योग्य शहरं नेमकी कोणती आणि त्यातून सर्वाधिक परतावा कसा मिळेल याबाबत जाणून घ्या सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
Personal Finance tips for Top 10 Investment-Worthy Areas: महाराष्ट्रातील रिअल इस्टेट बाजार 2026 मध्ये नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. मेट्रो प्रकल्प, नवीन विमानतळ, द्रुतगती मार्ग, आयटी हब आणि औद्योगिक कॉरिडॉरमुळे पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरमधील अनेक भाग गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी घरांच्या किंमतीत दहापेक्षा अधिक टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून येत आहे.
फ्लॅट खरेदीसाठी महाराष्ट्रातील टॉप 10 जागा
1. हिंजवडी – पुणे
पुण्याचे आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. पुणे मेट्रो लाईन-3 आणि आयटी कंपन्यांचा विस्तार यामुळे येथील निवासी मागणी कायम मजबूत आहे. भविष्यात भाडे उत्पन्न आणि भांडवली वाढ दोन्हीची संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
- सध्याची किंमत: 8,500 रू. ते 12,500 रु. प्रति चौ. फूट
- अपेक्षित वार्षिक वाढ: 8% ते 12%
2. बाणेर – बालेवाडी, पुणे










