नवरा कामावरुन आला अन् बायकोने थेट गुप्तांगावरच केले वार, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

नवरा-बायकोमध्ये वाद सुरु असतानाच बायकोचा संय सुटला आणि तिने थेट आपल्या नवऱ्याच्या गुप्तांगावरच वार केले. यानंतर घरातील सोनं घेऊन बायको फरार झाली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा कामावरुन आला अन् बायकोने थेट गुप्तांगावरच केले वार

point

नेमकं काय घडलं?

Crime News : बिहारमधील मुंगेर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणारा मोहम्मद फैसल खान याच्यावर त्याची पत्नी इशरत हसन उर्फ सानिया हिने धारदार शस्त्राने गुप्तांगावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेनंतर आरोपी सानिया घरातील दागिने आणि आपल्या चार महिन्यांच्या मुलीला घेऊन घटनास्थळावरून फरार झाली आहे.

अनैतिक संबंधातून वाद

घटनेनंतर कुटुंबीयांनी फैसलला जखमी अवस्थेत उपचारासाठी तातडीने सदर रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्या गुप्तांगावर चार टाके घालण्यात आले असून, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मोहम्मद फैसलची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पीडित फैसलने सांगितले की, त्याचा विवाह 13 एप्रिल 2025 रोजी भागलपूर जिल्ह्यातील कबीरपूर येथील रहिवासी असलेल्या इशरत हसन उर्फ सानियासोबत झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक होते, मात्र काही महिन्यांतच पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद सुरू झाले.

हे ही वाचा : तरुणी ट्रायलरूममध्ये कपडे बदलत होती, दुकान मालकाच्या मुलानं फोनद्वारे रेकॉर्ड..

गुप्तांगावर केले वार

फैसलने असा आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असून ती अनेकदा त्याच्याशी फोनवर बोलते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते आणि सानिया पतीपासून वेगळे राहण्याचा हट्ट करत होती. घटनेच्या एक दिवस आधीही सानियाचा फैसलच्या आईसोबत वाद झाला होता. घटनेच्या दिवशी संध्याकाळी फैसल कामावरून घरी परतला आणि झोपायला गेला, तेव्हा पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढल्याने सानियाने फैसलच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.

हे ही वाचा : लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणारा प्रकार

कायदेशीर कारवाई सुरु

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे पती-पत्नीमधील वादाचे प्रकरण आहे. प्राथमिक माहितीनुसार, पती आपल्या पत्नीला मारहाण करत असे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
 

हे वाचलं का?