तरुणी ट्रायलरूममध्ये कपडे बदलत होती, दुकान मालकाच्या मुलानं फोनद्वारे रेकॉर्ड..
Crime News : शनिवारी सायंकाळी कपड्याच्या दुकानात एक महिला कपडे बदलत होती. याचदरम्यान एकाने महिलेचते कपडे बदलतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या लज्जास्पद घटनेची माहिती मिळताच परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीसोबत ट्रायलरूममध्ये काय घडलं?
आरोपीला पकडून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू
Crime News : राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील चिरावा शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सायंकाळी कपड्याच्या दुकानात एक महिला कपडे बदलत होती. याचदरम्यान एकाने महिलेचते कपडे बदलतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या लज्जास्पद घटचनेची माहिती मिळताच परिसर हादरून गेला. काही संघटनांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीवर कठोर कारवाईची कायदेशीर माहणी केली. यामुळे संबंधित परिसरात ताणवजन्य परिस्थिती निर्माण झाली.
हे ही वाचा : लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणारा प्रकार
तरुणीसोबत ट्रायलरूममध्ये काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला ही चिरावा येथील जुन्या तहसीलदार रोडवर असलेल्या जॅम-जॅम कलेक्शन नावाच्या कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गेली होती. तिला काही कपडे विकत घ्यायचे होते. तरुणीने काही कपडे घेतले आणि परिधान करण्यासाठी ती ट्रायलरूममध्ये गेली होती, इतक्यात दुकान मालकाच्या मुलाने मोबाईलमधून तिचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. अचानक फोन वाजल्याने तरुणी सावध झाली. जवळून पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की, ट्रायलरूमच्या भागात एक लहान छिद्र पाडण्यात आलं. तिथून चित्रीकरण होत होते, ही घटना लक्षात येताच, महिलेनं तात्काळपणे आरडाओरड करत निषेध करण्यासाठी बाहेर आली.
आरोपीला पकडून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू
इतक्यातच पीडितेनं क्षणाचा कसलाही विलंब न करता स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली, नंतर लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीसोबत पीडितेनं प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे सादर केले. नंतर कारवाई करत आरोपी तरुणाची ओळख दुकान मालकाचा मुलगा शाहरूख अशी ओळख पटवली. आरोपी शाहरूखला तात्काळपणे पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली.
हे ही वाचा : तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अखेर विद्यार्थ्याने नको तेच.. भयंकर घडलं
दरम्यान पोलिसांनी जॅम-जॅम कलेक्शन बंद ठेवले असून घटनास्थळी कोणाताही अनुचित प्रकार घडू नये असा बंदोबस्त तैनात करण्यात आला. अशा परिस्थितीत या घटनेची माहिती चिराव येथे देखील वाऱ्यासारखी पसरली होती. चिरावाचे उपअधीक्षक विकास धिंडवाल यांनी तात्काळपणे पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.









