आधी राखी बांधून घेतली, अन् मग अश्लील फोटो बनवले, मोठ्या कांडात डॉक्टरही अडकला
Crime News : एका 21 वर्षीय तरुणीचे धर्मांतरण करून तिला सीरियाला नेण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी राखी बांधून घेतली, अन् मग अश्लील फोटो बनवले
मोठ्या कांडात डॉक्टरही अडकला
Crime News : एका 21 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पीडित कुटुंबाने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, इरशाद अली नावाच्या आरोपीने त्यांच्या मुलीचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला आणि तिला सीरियाला नेण्याची धमकी दिली. या संपूर्ण कटात पीजीआयमधील एका डॉक्टरचाही हात असल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला असून, या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : सातारा : सरकारी अभियंत्याचा अपघात, 3 लाखांची सुपारी, बायकोचा कट
अटकेसाठी पोलीस पथके रवाना
या गंभीर प्रकरणाची दखल घेत लखनौ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासाठी आणि मुख्य आरोपीला गजाआड करण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके गठित केली आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे, ज्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. मुख्य आरोपी इरशाद अली याचा फोन सध्या सर्व्हिलन्सवर ठेवण्यात आला असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणातील प्रत्येक दुवा तपासला जात असून तरुणीला लवकरात लवकर शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हेही वाचा : तेलही गेलं आणि तुपही गेलं, अब्दुल सत्तार यांना मोठा हादरा









