नवऱ्याला प्रेमाने खीर खाऊ घातली अन् प्रियकर आला, पुढं घडलं नको तेच
एका महिलेची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणाशी ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र त्या महिलेच्या नवऱ्याने या प्रकरणाला विरोध केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याला प्रेमाने खीर खाऊ घातली अन् प्रियकर आला
पुढं घडलं नको तेच
Crime News : अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पत्नीने आधी पतीला खिरीतून अंमली पदार्थ खायला घातले आणि नंतर प्रियकराला घरात बोलावून ही हत्या केली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने या क्रूर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून या महिलेची एका तरुणाशी मैत्री झाली होती, ज्याने स्वतःला नेव्हीत असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून गुन्ह्याचा सविस्तर खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशातील बागपत परिसरातील ही घटना आहे.
रचनाने केला शेजाऱ्याला फोन
सचिन डागर असे 34 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सचिन हे पत्नी रचना, 10 वर्षांची मुलगी नव्या आणि आठ वर्षांचा मुलगा शिवा यांच्यासोबत रहात होते. सचिन यांचे मोठे भाऊ नवीन डागर हे राजस्थानमधील झुंझुनू येथील एका शाळेत शिक्षक आहेत. शनिवारी पहाटे रचनाने शेजारी राहणाऱ्या मैमपाल यांना फोन करून सचिनची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती दिली. त्यानंतर सचिन यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मेडिसिटी रुग्णालयात रेफर केले. तिथे डॉक्टरांनी सचिन यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा : दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याचा राग, विकृत भावाने 44 दिवसात बहिणीला संपवलं!
गावकऱ्यांना आली शंका
सचिन यांचा मृतदेह गावात आणल्यानंतर त्यांच्या गळ्यावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. यामुळे संशय बळावल्याने नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये एक दुचाकीस्वार तरुण शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता सचिन यांच्या घरात जाताना आणि शनिवारी पहाटे बाहेर पडताना स्पष्टपणे दिसला. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त करत तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. दोन डॉक्टरांच्या पॅनेलने शवविच्छेदन केले असता, सचिन यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची पुष्टी झाली. तसेच त्यांच्या खांद्यावर आणि पाठीवर फरफटत नेल्याच्या खुणाही आढळून आल्या.
हे ही वाचा : घरात घुसून प्रसिद्ध युट्यूबरची हत्या, मेहुणा फरार; बायकोसोबत..
इन्स्टाग्रामवर जुळले सूत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पत्नी रचना हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. रचनाने सांगितले की, तिचे सोनू नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते आणि पती सचिन या संबंधांना तीव्र विरोध करत होता. यामुळे तिने सोनूसोबत मिळून सचिनचा काटा काढण्याचा कट रचला. घटनेच्या रात्री तिने खिरीमध्ये 5 ते 6 नशेच्या गोळ्या टाकून सचिनला खायला दिल्या. सचिन बेशुद्ध झाल्यानंतर तिने प्रियकर सोनूला घरी बोलावले आणि दोघांनी मिळून गळा आवळून त्याचा खून केला. सोनूशी तिची काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती आणि त्याने स्वतःला नेव्हीमध्ये असल्याचे सांगितले होते. सध्या पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून फरार प्रियकर सोनूच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे.









