तेलही गेलं आणि तुपही गेलं, अब्दुल सत्तार यांना मोठा हादरा
abdul sattar son abdul sameer nomination rejected : छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे. भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि शिवसेनेच्या रंजना जाधव यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवारांचे अर्जही अवैध ठरवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तेलही गेलं आणि तुपही गेलं
अब्दुल सत्तार यांना मोठा हादरा
abdul sattar son abdul sameer nomination rejected : छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी त्यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी कृषी उत्पन्न संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज छानणीदरम्यान त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अब्दुल समीर यांना आता या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही.
हेही वाचा : समजून घ्या: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडीत नेहरूंचा रेकॉर्ड खरंच मोडला?
अब्दुल सत्तार यांना तगडा झटका
विशेष म्हणजे संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल समीर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यावेळी सत्तार यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत काही आश्वासने दिल्याचा दावाही केला होता. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्जच बाद झाल्याने सत्तार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा : Personal Finance: महाराष्ट्रातील टॉप 10 जागा.. 'इथे' फ्लॅट खरेदी केल्यानंतर मिळेल जबरदस्त पैसा!









