रूबीचे धक्कादायक कांड, एक्स बॉयफ्रेंडला हाताशी धरत तरुणाला पुलावरून पाण्यात ढकललं अन्...

मुंबई तक

Crime news : पाच महिन्यांपूर्वी सहनरपूरमधील नानौटा येथे आशु नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येची सर्वत्र चर्चा देखील झाली होती. पाच महिन्यानंतर पोलिसांन आशुच्या हत्येचा गुन्हा उलगडल्याची माहिती समोर आली.  त्यांनी आशुची प्रेयसी रुबी आणि रुबीचा एक्स बॉयफ्रेंड सोनूला अटक केली आहे. 

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रुबीचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध

point

नवऱ्याला बोलावून दारू पाजली आणि पुलावरून ढकलले

Crime news : पाच महिन्यांपूर्वी सहनरपूरमधील नानौटा येथे आशु नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येची सर्वत्र चर्चा देखील झाली होती. पाच महिन्यानंतर पोलिसांनी आशुच्या हत्येचा गुन्हा उलगडल्याची माहिती दिली. त्यांनी आशुची प्रेयसी रुबी आणि रुबीचा एक्स बॉयफ्रेंड सोनूला अटक केली आहे. 

हे ही वाचा : फेमस रील स्टार अरुण तुपेचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ, घरातच मृतावस्थेत आढळला

नेमकं काय घडलं जाणून घेऊयात 

मोहल्ला मकदूम सराई बडा बगड येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय आशूचा मृतदेह 13 नोव्हेंबर रोजी एका नाल्यात आढळून आला होता. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पाच महिन्यानंतर, पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा उलगडा केला आहे. 

रुबीचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध

पोलीस तपासातून दिसून आले की, मृताची प्रेयसी रुबीचे आधी रंगेल गावातील एका रहिवासी सोनूशी प्रेमसंबंध होते. लग्न केले आणि नंतर सोनूपासून दूर गेली होती. याच काळात रुबी त्याच परिसरातील रहिवासी आशुशी जवळीकता साधली होती. लग्नानंतर सोनू रुबीला विसरू शकले नाही. काही काळानंतर सोनू आणि रुबी पुन्हा एकमेकांना पाहू लागले होते, पण त्यांच्या नात्यात आशु अडचण ठरत होता. 

हे ही वाचा : शेतात जातो असे सांगून अल्पवयीन मुलगा घरी परतला नाही, 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मृतदेह नाल्यात आढळला

नवऱ्याला बोलावून दारू पाजली आणि पुलावरून ढकलले

पोलीस तपासातून समोर आले की, 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री रुबी आणि सोनूने आशुला बोलावून दारू पिण्यास सांगितले. तो तरुण दारूच्या नशेत असताना त्यांनी त्याला पुलावरून ढकलून दिले असता, तो पाण्यात बुडाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. संबंधित प्रकरणात दोघांनाही अटक केली आणि तुरुंगात पाठवण्यात आले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp