ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल, सत्ताधाऱ्यांनी पळवल्याचा दावा, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मिथिलेश गुप्ता

KDMC Shivsena UBT Corporators Missing : कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट-रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

KDMC Shivsena UBT Corporators Missing
KDMC Shivsena UBT Corporators Missing
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल

point

सत्ताधाऱ्यांनी पळवल्याचा दावा

KDMC Shivsena UBT Corporators Missing : कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट-रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 'दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधीही जगणार नाही..', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

पोलिस ठाण्यात लेखी तक्रार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी चार नगरसेवक सध्या नॉट-रिचेबल आहेत. यातील मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन डोणे हे दोन नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्याने कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

'जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या'

नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अपहरण, दबाव किंवा फसवणुकीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपास करून तातडीने शोधमोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या, असे आवाहन शरद पाटील यांनी केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp