'दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधीही जगणार नाही..', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विशेष कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना UBT ने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचवेळी शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...
'मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात.. जो एक आभास निर्माण केला होता की, शिवसेना संपली.. ठाकरे हे नाव पुसून टाकणार.. त्यांना तुम्ही रोखलंत. हे फक्त महाराष्ट्र करू शकतो. मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल? जी जिवंत मनं आहेत ते आजसुद्धा माझ्या शिवसेनेच्या भगव्यासोबत आहेत हे परत तुम्ही दाखवून दिलंय. हीच आपली ताकद आहे.'
'बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं.. जसं पूर्वी आपण गुलामगिरीत राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जिणं येईल. गुलामीचं जगणं अजिबात शक्य नाही.. मेलो तरी बेहत्तर.. पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही.. ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे.'
'काय मिळवलं.. मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला.. काय मिळवलं काय? काय महापौर पद? आता आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष.. आजही आपली मतं कमी झालेली नाही, सगळे गड आपण राखलेत.. हे कर्तृत्व तुमचं आहे. पण मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्यांनी विचार केला पाहिजे की, आपल्याला जपणारं कोण आहे, अडीअडचणीच्या वेळी धावून येणारं कोण आहे. आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारा आणि आपल्याला विकत घेणारा.. वेळेवर धावून येत आपला जीव वाचवू शकतो?'
हे ही वाचा>> 'मला तर अक्षरश:...', राज ठाकरे पहिल्यांदाच KDMC बाबत बोलले.. तेही उद्धव ठाकरेंच्या समोरच!
'हे जे काही गद्दारी करणारे लोकं आहेत ना.. त्यांना किती पैसे मिळाले.. 50 खोके ना.. मग मी जातो ना त्यांच्याबरोबर.. किती मिळतील मला तर.. पण मग मला यांचं नाव घेता येणार नाही. मी नालायक म्हणून या घराण्यात जन्माला आलोय हा शिक्का माझ्या कपाळावर मी कधी लागू देणार नाही.'










