चिमुरडीला खाऊ देतो असं सांगितलं अन् नेलं निर्जनस्थळी नंतर...गावकरीही संतापले
maharashtra crime : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने एका 8 वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात माणुसकीला काळिमा
22 वर्षीय तरुणाने एका 8 वर्षीय मुलीसोबत केलं हैवानी कृत्य
Maharashtra Crime : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने एका 8 वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य केलं आहे. आरोपीनं पीडितेला डोंगराच्या पायथ्याला नेलं आणि लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला पुन्ह तिच्या घरी सोडले. अत्याचारानंतर पीडितेला वेदना होऊ लागल्याने तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला. संबंधित प्रकरणात आरोपी नराधमावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अनिल केरबा काळे असे आहे. ही घटना शिरपूर दहिगावात 15 ऑगस्ट रोजी घडली.
हे ही वाचा : शिर्डी हादरली! मध्यरात्री दोघांनी तरुणाला घेरलं, नंतर धारदार शस्त्राने सपासप वार केले, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला...
अनिल हा एक हॉटेल व्यवसायिक आहे. पीडित मुलगी आपल्या घरात टीव्ही बघताना आरोपी आला. त्याने खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घराच्या बाहेर आणले. यानंतर तिला एका डोंगराच्या पायथ्याला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. या घटनेदरम्या, संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीच्या भावाच्या दुकानावर हल्ला करत दुकान जाळून टाकले.
नराधमाची पीडितेवर नजर
पीडित मुलगी ही घरात टीव्ही बघत बसली होती. टीव्ही पाहिल्यानंतर ती आपल्याच वयातील मुलांसोबत खेळायला गेली होती. तेव्हा ती लहान मुलांसोबत खेळत होती. त्याचक्षणी नराधमाची पीडितेवर नजर पडली असता, त्याने तिला खाऊ देतो असं सांगितलं. त्यानंतर तिला एका डोंगराच्या पायथ्याशी शिवारात नेले आणि अत्याचार करण्यात आला.
हे ही वाचा : मुंबईत वृद्ध महिलेसोबत मोठा स्कॅम, ऑनलाईन दुध मागवलं अन् 'इतक्या' लाखांना घातला गंडा, नेमकं काय घडलं?
अत्याचारानंतर आरोपीने मुलीला घरी आणले असता, तिला मोठ्या प्रमाणात वेदना होऊ लागल्या. तेव्हा कुटुंबियांनी पीडितेला विचारले असता, पीडितेनं घडलेला सर्वच प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आरोपी अनिल काळे याला अटक करण्यात आली आहे.तेव्हा गावकऱ्यांनी संतप्त होत आरोपीच्या भावाचे हॉटेल जाळले. या घटनेमुळे गावात तणावजन्य परिस्थिती आहे.










