मुंबईत वृद्ध महिलेसोबत मोठा स्कॅम, ऑनलाईन दुध मागवलं अन् 'इतक्या' लाखांना घातला गंडा, नेमकं काय घडलं?
Mumbai News : मुंबईतील वडाळा येथील एका वृद्ध महिलेला ऑनलाईन दूध मागवने अंगलट आलं आहे. ऑनलाईन दुध मागवल्याने वृद्ध महिलेला लाखो रूपयांचा गंडा घातला असून नेमकं काय घडलं जाणून घ्या.

बातम्या हायलाइट

मुंबईतील वडाळा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस

71 वर्षीय वृद्ध महिलेला ऑनलाईन दुध खरेदी करणं आलं अंगलट

नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : मुंबईतील वडाळा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 71 वर्षीय वृद्ध महिलेनं ऑनलाईन दूध खरेदी करणं हे तिच्याच अंगलट आलं आहे. ऑनलाईन दूध ऑर्डर करण्याच्या प्रक्रियेत तिचे तब्बल 15.5 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. वृद्ध महिलेनं 4 रोजी एका अॅपद्वारे ऑनलाईन दूध ऑर्डर केले होते. त्यानंतर एका व्यक्तीने तिला फोन केला आणि त्याने स्वत:ची दीपक, ब्रँडेड मिल्क या कंपनीचा कार्यकारी अधिकारी अशी ओळख करून दिली. त्याने तिच्या मोबाईल फोन नंबरवर एक लिंक पाठवली आणि दूध ऑर्डर करण्यासाठी तिची माहिती देण्यास सांगितली.
हे ही वाचा : बुध ग्रह 'या' तारखेला राशी बदलणार, काही राशीतील लोकांना पैशांचा कधीच तुटवडा पडणार नाही
वृद्ध महिलेची बँकिंगसंबंधित माहिती घेतली जाणून...
महिलेला कॉल डिस्कनेक्ट न करता लिंकवर क्लिक करण्यास आणि पुढील सूचनांचे पालन करण्यास भाग पाडले. दरम्यान, दोघांमध्ये एक तास संभाषण सुरुच होते. तथापि, कॉल एक तासाहून अधिक काळ सुरू राहिल्याने महिलेला कंटाळा आला आणि तिने कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी त्याच महिलेला त्याच व्यक्तीने पुन्हा कॉल केला आणि तिची बँकिंग संदर्भात माहिती जाणून घेतली.
18.5 लाख रुपयांचे नुकसान
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेला पैसे काढण्याबाबत काही सूचना देण्यात आल्या. जेव्हा ती बँकेत गेली तेव्हा तिला कळालं की, तिच्या एका खात्यातून 1 लाख 70 हजार रुपये कापले गेले आहेत. तसेच तिची दोन बँक खातीही रिकामी झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाक महिलेच्या तीन बँकांमध्ये जमा असलेल्या एकूण 18.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आणि तिची तिन्ही बँक खाती रिकामी करण्यात आली आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: पैसे कधी दुप्पट होतील? '72 चा फॉर्म्युला' आहे खूप कामाचा!
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसीर, प्रथमदर्शनी असे आढळून आले की, आरोपीने तक्रारदाराजच्या फोनद्वारे महिलेला एक लिंक पाठवली होती. त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं आणि तिला बोलण्यात गुंतवूण ठेवले होते. तेव्हाच तिचा बंबरही हँक करण्यात आला. दरम्यान, महिलेच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.