बुध ग्रह 'या' तारखेला राशी बदलणार, काही राशीतील लोकांना पैशांचा कधीच तुटवडा पडणार नाही

15 सप्टेंबर रोजी बुध ग्रह हा कन्या राशीत प्रवेश करेल. काही राशीच्या लोकांना बुध आपल्या उच्च राशीत गेल्याने भरपूर लाभ मिळू शकतो.

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर मोठा बदल निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, ऑगस्टच्या अखेरीस बुध ग्रह हा कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार. त्यानंतर, 15 सप्टेंबर रोजी तो कन्या राशीत प्रवेश करेल. काही राशीच्या लोकांना बुध आपल्या उच्च राशीत गेल्याने भरपूर लाभ मिळू शकतो.

Astrology

2/5

बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि शिक्षणाचा कारक मानला जातो. जेव्हा हा ग्रह आपला मार्ग बदलू लागतो तेव्हा काही राशीतील हे संक्रमण भाग्यशाली ठरू शकते. याच संक्रमाणाचा काही राशीतील लोकांच्या आयुष्यात चांगला बदल निर्माण होतो.  

Astrology

3/5

मिथून राशी 

मिथून राशीतील लोकांसाठी बुध राशीचा कन्या राशीतल प्रवेश फायदेशर ठरणार आहे. यामुळे मिथून राशीतील लोकांना त्यांच्या कामात यश मिळण्याची संधी आहे. तसेच विद्यार्थ्यांना विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेअर बाजारातूनही चांगले पैसे कमावू शकता, असे ज्योतिषशास्त्र सांगतं.

Astrology

4/5

तूळ राशी 

तूळ राशीतील लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. करिअरमध्ये नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तसेच धार्मिक यात्रा होण्याची शक्यता असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. 

Astrology

5/5

बुध ग्रह 
 

बुध ग्रह हा मकर राशीत नवव्या स्थानी घरात प्रवेश करणार आहे. या बुध ग्रहाच्या प्रवेशाचा परिणाम हा मकर राशीतील लोकांच्या आयुष्यावर होताना दिसतो. या काळात दीर्घकाळापासून खोळंबलेले काम पूर्ण होईल. त्याचप्रमाणे बँकेतून कर्ज मिळणे सोपे होईल. व्यवसाय क्षेत्रात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp