सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे 'शुक्रादित्य राजयोग'... 'या' राशींच्या लोकांसाठी गेम-चेंजर ठरणार! करिअर अन् संपत्तीत वाढ...
ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, जिथे विलासाचा ग्रह शुक्र आधीच उपस्थित आहे. सूर्य आणि शुक्राच्या या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशींसाठी गेम-चेंजर ठरणार आहे.
ADVERTISEMENT

1/6
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, 15 मार्च 2026 हा या वर्षातील एक महत्त्वाचा दिवस असल्याचं सांगितलं जात आहे. या दिवशी, ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, जिथे विलासाचा ग्रह शुक्र आधीच उपस्थित आहे. सूर्य आणि शुक्राच्या या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशींसाठी गेम-चेंजर ठरणार आहे.

2/6
सूर्याचं तेज आणि शुक्रता सौम्यता एकत्र येतात, तेव्हा मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि अफाट धनसंपत्तीचे योग बनतात. कला किंवा व्यवसायात उच्च पदावर कार्यरत असलेल्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्राची ही युती फायदेशीर ठरणार असल्याची शक्यता आहे. कोणत्या राशींचं नशीब पालटणार? जाणून घ्या.

3/6
मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रादित्य योग वरदान ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. तसेच, बॉस आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा भागीदारीत असाल तर हा काळ मोठा नफा मिळवून देऊ शकतो.

4/6
तूळ: तूळ राशीवर शुक्राचेच नियंत्रण आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना शुक्रादित्य योगाचे सकारात्मक परिणाम सर्वात जास्त दिसून येतील. अविवाहित व्यक्तींना आकर्षक विवाह प्रस्ताव मिळू शकतात. करिअर बदलण्याचा विचार करणाऱ्यांना इच्छित संधी मिळेल. तसेच, तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल.

5/6
मीन: मीन राशीत सूर्य आणि शुक्राची युती होत असल्यामुळे मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तसेच, नोकरी पेशात असलेल्या लोकांसाठी प्रमोशन किंवा पगारवाढीची गूड न्यूज मिळू शकते.

6/6
युतीच्या या काळात मिथुन, तूळ आणि मीन राशींच्या लोकांचं कौटुंबिक आयुष्य अधिक आनंदी राहील. गुंतवणूक करण्यासाठी देखील हा उत्तम काळ आहे. शुक्रादित्य योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी, या काळात सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं किंवा पदार्थांचं दान करा.












