फेब्रुवारी महिन्यात ज्योतिषीय उलथापालथ; प्रलंबित कामे पूर्ण होणार, पण काही राशींच्या लोकांसमोर आव्हाने...

ज्योतिषशास्त्रानुसार, काल 17 फेब्रुवारी रोजी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागलं होतं. जरी भारतात ग्रहण दिसलं नसलं तरी, सूर्यावरील त्याचा प्रभाव काही राशींवर पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Google CTA
वर्षातील पहिलं सूर्यग्रहण

1/5

Astrology: काल म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी 2026 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागलं होतं हे कंकणाकृती सूर्यग्रहण होतं आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणांना अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण त्यांचा मानवी जीवनावर आणि जगावर थेट परिणाम होत असल्याचं सांगितलं जातं. 
 

सूतक (शोककाळ) चे नियम

2/5

हे सूर्यग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात झालं. महत्त्वाची बाब म्हणजे, हे ग्रहण भारतातून दिसलं नाही. धार्मिक नियमांनुसार, जिथे ग्रहण दिसत नाही तिथे सूतक (शोककाळ) चे नियम लागू होत नाहीत. म्हणून, भारतातील रहिवाशांना सुतक (शोककाळ) चे नियम पाळण्याची गरज नव्हती. 
 

कारकिर्दीत मोठं यश

3/5

जरी भारतात ग्रहण दिसलं नसलं तरी, सूर्यावरील त्याचा प्रभाव काही राशींवर पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे ग्रहण मेष, वृषभ, कन्या आणि धनु राशीसाठी शुभ आहे. या राशींच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि त्यांच्या कारकिर्दीत मोठं यश मिळण्याची शक्यता आहे.
 

सावधगिरी बाळगण्याचा सल्ला

4/5

तसेच, या ग्रहणामुळे काही राशींच्या लोकांसाठी आव्हाने येऊ शकतात. मिथुन, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना पुढील दीड महिन्यांसाठी आरोग्य, आर्थिक आणि कौटुंबिक वादांबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः कुंभ राशीच्या लोकांनी घाईघाईने निर्णय घेणे टाळावे.
 

काही राशींच्या जीवनात उलथापालथ

5/5

फेब्रुवारी महिना हा खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप घटनापूर्ण असणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कुंभ आणि धनिष्ठा नक्षत्रात होईल. यानंतर लगेचच, 19 फेब्रुवारी रोजी सूर्य राहूच्या नक्षत्रात, शतभिषामध्ये प्रवेश करेल. या दुहेरी बदलामुळे काही राशींच्या जीवनात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.