Astrology: गुरू आणि शुक्र ग्रहाच्या विशेष गोचरमुळे धनाचा वर्षाव! कोणत्या राशींना मिळणार हे वरदान?

2026 च्या सुरुवातीला, गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे 'नवपंचम राजयोग' निर्माण होत आहे. 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 1:29 वाजता शुक्र आणि गुरु 120 अंशाच्या कोनात एकत्र आल्यानंतर काही राशींच्या लोकांना याचा प्रचंड फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

social share
google news
'नवपंचम राजयोग'

1/7

Astrology: ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची हालचालीमुळे महत्त्वपूर्ण बदल होतात. 2026 च्या सुरुवातीला, गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे 'नवपंचम राजयोग' निर्माण होत आहे. 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 1:29 वाजता शुक्र आणि गुरु 120 अंशाच्या कोनात एकत्र आल्यानंतर काही राशींच्या लोकांना याचा प्रचंड फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर धनाचा वर्षाव होईल? 
 

आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती

2/7

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन शुभ ग्रह एकमेकांपासून पाचव्या आणि नवव्या घरात असतात तेव्हा 'नवपंचम राजयोग' तयार होतो. सध्या शुक्र कुंभ राशीत आहे आणि गुरू मिथुन राशीत आहे. दोघांमधील ही विशेष स्थिती काही राशींच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती आणणार असल्याचं मानलं जात आहे. 
 

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल

3/7

2025 मध्ये मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर, गुरु ग्रहाची गती जलद होत आहे. 2026 मध्ये तो बऱ्याचदा आपलं स्थान बदलेल. गुरू आणि शुक्राच्या या युतीमुळे करिअरमध्ये प्रगती होईल तसेच सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. 
 

कर्क

4/7

कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग वरदान ठरेल. तुमच्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवण्याची हीच वेळ आहे. व्यवसाय विस्ताराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि महत्त्वाचे सामाजिक संबंध तुमच्या कारकिर्दीला लक्षणीयरीत्या चालना देतील. मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. 
 

कुंभ

5/7

कुंभ: कुंभ राशींच्या लोकांच्या लग्नाच्या बाबतीत मंगळ आणि पाचव्या घरात गुरु अत्यंत प्रबळ आहेत. नवपंचम राजयोगाच्या प्रभावामुळे कामावर उच्च पद किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षाही मजबूत होईल. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात परिपूर्ण संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. 
 

मीन

6/7

मीन: मीन राशीच्या लोकांसाठी, हा काळ भूतकाळातील कष्ट आणि कर्जातून मुक्तता मिळविण्यासाठी अनुकूल आहे. बाराव्या घरात मंगळ आणि चौथ्या घरात गुरुच्या प्रभावामुळे आर्थिक सुधारणा होईल. कुटुंबातील तणाव संपतील आणि सुखसोयी वाढतील. तुमच्यासोबत नवीन व्यावसायिक भागीदार येण्याची शक्यता आहे. 
 

करिअरसाठी सुवर्णकाळ

7/7

हा नवपंचम राजयोग तुमच्या आयुष्यात संपत्तीसोबत नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देखील आणेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मोठी गुंतवणूक आणि करिअरशी संबंधित निर्णय घेण्यासाठी हा एक सुवर्णकाळ आहे.
 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp