Personal Finance: पैसे कधी दुप्पट होतील? '72 चा फॉर्म्युला' आहे खूप कामाचा!
Financial Planning Tips:72 चा फॉर्म्युला सांगतो की, तुमचे पैसे कोणत्याही गुंतवणुकीत किती वर्षांत दुप्पट होऊ शकतात. जाणून घ्या हा 72 फॉर्म्युला नेमका आहे तरी काय.
ADVERTISEMENT

Personal Finance Financial Planning Tips: प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते की त्याचे उत्पन्न दुप्पट होईल आणि भविष्यातील गरजांसाठी एक चांगला निधी निर्माण होईल जसे की निवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा लग्न. जर तुम्ही मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा पोस्ट ऑफिस योजनांमध्ये देखील गुंतवणूक करत असाल आणि तुमचे पैसे कधी दुप्पट होतील असा प्रश्न पडत असेल, तर आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर म्हणजे फॉर्म्युला - 72 चा नियम. जर तुम्हाला स्मार्ट गुंतवणूकदार बनायचे असेल, तर हे सूत्र तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
72 चा नियम काय आहे?
कोणत्याही गुंतवणुकीत तुमचे पैसे किती वर्षांत दुप्पट होतील हे शोधण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. फक्त 72 ला गुंतवणुकीच्या व्याजदराने भागा. जो काही आकडा बाहेर येईल, तेवढ्या वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.
वेगवेगळ्या गुंतवणुकीत 72 चा फॉर्म्युला कसं करतो काम?
- मुदत ठेव (FD): जर FD 7 टक्के वार्षिक व्याज देत असेल, तर पैसे सुमारे 10.28 वर्षांत (72÷7) दुप्पट होतील.
- PPF: सध्या, PPF वर 7.1 टक्के व्याज आहे, म्हणजेच रक्कम सुमारे 10.14 वर्षांत (72÷7.1) दुप्पट होईल.
- शेअर बाजार: जर निफ्टी-50 हे 2024 मध्ये 13.5 टक्के परतावा देत असेल, तर पैसे फक्त 5.33 वर्षांत (72÷13.5) दुप्पट होऊ शकतात.
- म्युच्युअल फंड: 12 टक्के सरासरी परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये, पैसे सुमारे 6 वर्षांत (72÷12) दुप्पट होतील.
72 चा नियम (Rule of 72) हा गुंतवणुकीतील रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे काढण्याचा सोपा फॉर्म्युला आहे. यात वार्षिक व्याजदराने किंवा परताव्याच्या दराने 72 ला भागले जाते, आणि त्यातून कालावधी (वर्षांत) मिळतो. हा नियम चक्रवाढ व्याज (compound interest) असलेल्या गुंतवणुकीसाठी लागू होतो. एका उदाहरणाने याचे प्रकार समजावून घेऊ. सागर हा 27 वर्षांचा तरूण गुंतवणूक करीत आहे. पण त्याचे पैसे केव्हा दुप्पट होतील हे आपण आता समजून घेऊया.
1. मुदत ठेव (FD): सागर 1 लाख रुपये 7% वार्षिक व्याजदर असलेल्या FD मध्ये गुंतवतो. 72 चा नियम वापरून, 72 ÷ 7 = 10.28 वर्षे म्हणजे, सागरचे 1 लाख रुपये सुमारे 10.28 वर्षांत 2 लाख रुपये होतील.










