एल्विश यादवच्या घरावर तब्बल 'एवढे' राउंड गोळीबार, घरी कोण कोण होते? घटनेचा थरार

Elvish yadav firing : हरियाणातील गुरूग्राम येथील प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे, तेव्हा घरात कोण होतं हे जाणून घ्या.

elvish yadav house firing
elvish yadav house firing
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार

point

गोळीबार झाला तेव्हा घरी कोण होते?

Elvish yadav firing : हरियाणातील गुरूग्राम येथील प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. एल्विश यादवच्या घरासमोर तब्बल 25 अधिक राउंड गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाला तेव्हा घरी आई सुषमा यादव ही घरीच होती. गुरूग्राम येथील पोलीस ठाणे अंतर्गत या घटनेचा तपास केला जात आहे. 

हे ही वाचा : चिमुरडलीला खाऊ देतो असं सांगितलं अन् नेलं निर्जनस्थळी नंतर...गावकरीही संतापले

एल्विशच्या घरावर गोळी तेव्हा घरी कोण होते? 

एल्विश यादवच्या वडिलांना आज तक या प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की, एल्विश घरी नव्हता. कुटुंबातील काही लोक घरी होते. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी सखोल चौकशी केली. परंतु गोळीबाराच्या घटनेपूर्वी एल्विश यादव यांना कसलीही धमकी मिळाली नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर दोन हल्लेखोर घराच्या गेटबाहेर उभे असल्याचे दिसून आले. 

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार केल्याने त्याच्या चाहत्यांच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस संबंधित प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत, तसेच हल्लेखोर पुढील शोधाशोध घेताना दिसत आहेत. या अशा घटनांमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ  लागला आहे. 

यापूर्वी एल्विशच्या मित्राच्या घरावर गोळीबार

यापूर्वी गायक राहुल फाजिलपुरियावरही हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी गुरूग्रामच्या एसपीआर रोडवर ही घटना घडवून आणली होती. नंतर पोलिसांनी अशा कोणत्याही घटनेचा नकार दिला होता. 

हे ही वाचा : शिर्डी हादरली! मध्यरात्री दोघांनी तरुणाला घेरलं, नंतर धारदार शस्त्राने सपासप वार केले, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

एल्विश आणि राहुल फाजिलपुरुयावाला हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एका मोठ्या गुंडाने गोळीबाराची जबाबदारी घेतली. याचवरून असे दिसून येते की, हे प्रकरण एकमेकांशी जोडले गेले आहेत. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp