Pune Crime : पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय, नंतर तीन तलाकची केली मागणी, भरचौकातच ब्लेडने तोंडावर केले सपासप वार

Pune Crime : पिंपरीत एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तलाकची मागणी केली आहे.  त्यानंतर तुझं बाहेर कुठे तरी लफड असेल असा आरोपही केला असल्याचं बोललं जातंय.

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील महिलांच्या अत्याचारात वाढ

point

तलाकची केली मागणी आणि नंतर ब्लेडने केले वार

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime : राज्यातील सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र आता याच पुण्यात मोठ्या प्रमाणात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. पिंपरीत एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तलाकची मागणी केली आहे. त्यानंतर तुझं बाहेर कुठे तरी लफड असेल असा आरोपही केला असल्याचं बोललं जातंय. त्यानंतर संबंधित व्यक्तीने महिलेवर ब्लेडने सपासप वार केले होके. ही घटना पिंपरीतील थेरगाव येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली होती. 

हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पावसाचा हाहाकार, रत्नागिरी- सिंधुदुर्गात वरूणराजाचं रौद्ररुप अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट

तू तलाक का देत नाहीस? 

घडलेल्या घटनेनुसार, पीडित महिला ही कामावर होती. तेव्हा तिचा पती सलमानने तिला तालकची मागणी केली. तू तलाक का देत नाहीस? असा प्रश्न केला. तेव्हाच सलमानने तिच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार केले. सलमानला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. तेव्हा डोक्यामागे, कानामागे गांभीर जखमा करण्यात आल्या होत्या. दरम्यान तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

संबंधित प्रकरणात रमजान शेख आणि दुसरा आरोपी हुजेफा आबेद शेख या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हुफेजा हा मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराईचा असल्याचं सांगण्यात येते. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : नवरा-बायकोच्या वादात बायको माहेरी बसली रुसून, परतण्यास केली विनवणी पण अखेर चार मुलांसह पतीने...

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

 

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. एवढंच नाही,तर पुण्यातील वाढती गुन्हेगारी पाहता राज्यासाठी चिंतेची बाब आहे. पुण्यात दररोज एक गुन्हा घडत असल्याचे निदर्शनास येताना दिसते. पुणे शहराला गुन्हेगारीचं हॉट्स्पॉट म्हटलं जातं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp