Maharashtra Weather: कोकणात पावसाचा हाहाकार, रत्नागिरी- सिंधुदुर्गात वरूणराजाचं रौद्ररुप अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट

Maharashtra Weather Today : भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 18 ऑगस्ट रोजी राज्यातील दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रभावामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra Weather Today (फोटो- Grok AI)
Maharashtra Weather Today (फोटो- Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

18 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान

point

अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

point

'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 18 ऑगस्ट रोजी राज्यातील दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रभावामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हे ही वाचा : नात्याला काळिमा! लेकाचा आईच्या चरित्र्यावर संशय, नंतर स्वत:च केले लैंगिक शोषण, हादरवून टाकणारी घटना

कोकण आणि मध्य महाराष्ट्र : 

कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अतिमुसळधार पावसासह (204.5 मिमी पेक्षा जास्त) जोरदार वारे (40-50 किमी/तास) आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. तसेच पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्गात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा : 

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच इतर मराठवाड्यातील भागात मध्यम ते मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.

विदर्भ :

विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पावसाचा ऑरेंज अलर् जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, भंडारा आणि अमरावती येथे मध्यम वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची अपेक्षा आहे. 

हे ही वाचा : एल्विश यादवच्या घरावर तब्बल 'एवढे' राउंड गोळीबार, घरी कोण कोण होते? घटनेचा थरार

उत्तर महाराष्ट्र :

नाशिक, जळगाव आणि धुळे येथे तुलनेने कमी पावसाचा अंदाज असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हे वाचलं का?

    follow whatsapp