दोन मुलं तरी महिलेला लागलेली अनैतिक संबंधाची चटक, लग्न झालेला बॉयफ्रेंड घरी यायचा अन्..
एका तरुणाने त्याच्या आधीच्या प्रेयसीने त्याच्या अवैध संबंधांना नकार दिल्याने तिच्यावर 9 वेळा चाकूने वार करून तिची हत्या केली. इतकेत नव्हे तर त्या तरुणाने नंतर त्याच चाकूने स्वत: वर वार करून आत्महत्या केली.

बातम्या हायलाइट

प्रियकराचे एक्स गर्लफ्रेंडसोबत अनैतिक संबंध

अनेैतिक संबंधाला नकार देताच प्रेयसीची हत्या

अन् नंतर प्रियकराने केली आत्महत्या...
Crime News: कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या आधीच्या प्रेयसीने त्याच्या अवैध संबंधांना नकार दिल्याने तिच्यावर 9 वेळा चाकूने वार करून तिची हत्या केली. इतकेत नव्हे तर त्या तरुणाने नंतर त्याच चाकूने स्वत: वर वार करून आत्महत्या केली. आनंद सुतार आणि रेश्मा थिराविर अशी मृतांची ओळख पटली आहे. आनंद 31 वर्षांचा होता आणि रेश्मा 30 वर्षांची होती.
आधी हत्या अन् नंतर आत्महत्या...
आनंदने आधी रेश्माची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील बिडी गावातील असल्याचे वृत्त आहे. रेश्मा आणि आनंद दोघेही बिडी गावातील रहिवासी होते आणि ते दोघे बालपणीचे चांगले मित्र होते. कालांतराने रेश्मा आणि आनंद एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा रेश्माच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा तिच्या पालकांनी तिचं लग्न त्याच गावातील शिवानंद नावाच्या तरुणाशी लावून दिलं.
दरम्यान, आनंदने सुद्धा दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. रेश्माच्या लग्नानंतर तिला दोन मुलं झाली. लग्नानंतर आनंद आणि रेश्मा फक्त मित्र राहिले असले तरी, गेल्या दोन वर्षांत त्यांचं नातं अवैध संबंधात बदललं. गेल्या महिन्यात शिवानंद म्हणजे रेश्माच्या नवऱ्याने रेश्मा आणि आनंदला रंगेहाथ पकडलं होतं. त्यावेळी रेश्माचा पती शिवानंदने नंदगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसात केली तक्रार
शिवानंदच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आनंदला पोलिस ठाण्यात बोलावून आनंदला वॉर्निंग दिली आणि त्याचा जबाब लिहून पाठवला. त्यानंतर, रेश्मा आनंदपासून दूर गेली, परंतु आनंदने रेश्माला त्याच्याशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी त्रास देण्यास सुरूवात केली. या काळात रेश्माने आनंदला समजावण्याचा प्रयत्न केला. शिवानंद घरी नसताना आनंद रेश्माकडे जायचा.
हे ही वाचा: 'सैयारा'पेक्षा खतरनाक प्रेमी! गर्लफ्रेंडला उडवण्याचा रचला कट, होम थिएटरमध्ये बॉम्ब लपवून गिफ्ट घरी पाठवलं अन् नंतर घडलं..
रेश्माने हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला असता आनंद संतापला. शुक्रवारी (15 ऑगस्ट) सकाळी शिवानंद गायींचे दूध काढण्यासाठी डेअरीत गेला होता. यादरम्यान आनंदने मागच्या दाराने शिवानंदच्या घरात प्रवेश केला आणि रेश्माच्या पोटात नऊ वेळा वार करून तिची हत्या केली. रेश्माच्या लहान मुलीने तिच्या आईची हत्या झाल्याचं पाहिलं. हल्ला झाल्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रेश्माचा जागीच मृत्यू झाला. रेश्माच्या मृत्यूने घाबरून आनंदने त्याच चाकूने स्वतःच्या पोटात पाच-सहा वार केले आणि आत्महत्या केली.
हे ही वाचा: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला अन्... कुटुंबियांचा संताप अनावर
त्यानंतर, शेजाऱ्यांनी आनंदला ताबडतोब रुग्णालयात नेलं आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, आनंदचा वाटेतच मृत्यू झाला. आनंदच्या मृतदेहाचं जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.