पत्नी बॉडी बिल्डरसोबत पळून गेली..पतीनं मांत्रिकाचा खेळच खल्लास केला! मित्रांच्या मदतीनं मांत्रिकाचा खून केला अन्..
Husband Killed Tantrik : उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची पत्नी बॉडी बिल्डर तरुणावर फिदा झाली.

बातम्या हायलाइट

मांत्रिकामुळे पत्नी पळून गेली अन्..

पतीची मांत्रिकाची केली निर्घृण हत्या

त्या गावात नेमकं काय घडलं?
Husband Killed Tantrik : उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची पत्नी बॉडी बिल्डर तरुणावर फिदा झाली. त्यानंतर महिलेनं त्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् पळून गेली. याबाबत महिलेच्या पतीला कळताच त्याची सटकली. त्याला वाटलं की, पत्नी पळून जाण्यामागे मांत्रिकाचा हात आहे. त्यानंतर त्याने मांत्रिकाचा बदला घेण्याचा प्लॅन केला अन् त्याला जेलवारी करावी लागली.
त्या गावात नेमकं काय घडलं होतं?
हे धक्कादायक प्रकरण बिसरख परिसरातील रोजा जलालपूर गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका मांत्रिकाची हत्या करण्यात आली. नरेश प्रजापती असं हत्या झालेल्या मांत्रिकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंधश्रद्धा हे हत्येमागचं कारण होतं. 5 पैकी एका आरोपीला संशय होता की, मांत्रिकाकडे असलेल्या काळ्या जादूमुळे त्याची पत्नी अन्य व्यक्तीसोबत पळून गेली. याच कारणामुळे त्याने तीन महिन्यांपूर्वी त्याच्या हत्येचा कट रचला होता.
हे ही वाचा >> "खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, खांद्यावर बंदूक ठेऊन...",मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नेमकं काय म्हणाले?
मांत्रिक 2 ऑगस्टला बेपत्ता झाला होता. 3 ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह बुलंद शहराच्या एका नात्यात सापडला. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तपास सुरु केला आणि पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. नीरज कुमार (हापुड),सुनील कुमार (ग्रेटर नोएडा), सौरभ कुमार आणि प्रविण मावी (बुलंदशहर), प्रविण शर्मा (रोजा जलालपूर, बिसरख) अशी आरोपींची नावे आहेत.
मांत्रिकामुळे पत्नी पळून गेली अन्..
पोलीस तपासात उघडकीस आलं की, प्रविण शर्माची पत्नी 2022 मध्ये अन्य व्यक्तीसोबत घर सोडून गेली होती. शर्माला वाटत होतं की, मांत्रिक जो नेहमी त्यांच्या घरी यायचा, त्याने काळ्या जादूचा वापर करत त्याच्या पत्नीला पळवून लावलं. त्यानंतर त्याने मांत्रिकाचा बदला घेण्याचं ठरवलं. एसीपी दीक्षा सिंगने सांगितलं की, प्रविण शर्माने त्याच्या चार साथीदारांना या हत्येत सामील होण्यासाठी जमिन आणि लक्झरी वाहन देण्याचं आमिष दिलं होतं.