पैसा-पाणी: यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, GST 2.0 मुळे शॉपिंग होणार स्वस्त!
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी एक मोठी घोषणा केली. GST मध्ये काही बदल केले जाणार आहेत. ज्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होतील. याचबाबत आपण जाणून घेऊया पैसा-पाणी या विशेष ब्लॉगमधून.
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली आहे की, दिवाळीपर्यंत वस्तू आणि सेवा करात (GST) मोठा बदल केला जाईल. यामुळे दर कमी होतील. वस्तू आणि सेवा स्वस्त होतील. याचा तुम्हाला कसा फायदा होईल हे आपण पैसा-पाणी या विशेष सदरातील ब्लॉगमधून जाणून घेऊया.
2017 मध्ये GST लागू होण्यापूर्वी, केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळे कर वसूल करत होते. केंद्र सरकार वस्तू बनवणाऱ्या कारखान्यांवर उत्पादन शुल्क आकारत होते आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण, फोन बिल इत्यादी सेवांवर स्वतंत्रपणे कर लावत होते. त्यानंतर प्रत्येक राज्य त्या वस्तूंच्या विक्रेत्यावर विक्री कर लावत होते. महानगरपालिका त्यांच्या शहरात वस्तूंच्या प्रवेशावर जकात वसूल करत होती.
यामुळे, देशाच्या वेगवेगळ्या भागात वस्तू किंवा सेवांच्या किंमती या वेगवेगळ्या असायच्या. आता फक्त दारू, पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत, त्यामुळे त्यांच्या किंमती देशभरात कमी-अधिक प्रमाणात आहेत.
2017 मध्ये जेव्हा जीएसटी लागू करण्यात आला तेव्हा सरकारने म्हटले होते की, देशात एकच कर असेल, परंतु 2025 पर्यंत देशात 50 प्रकारचे कर लादले जात आहेत. जीएसटी लागू होण्यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम समितीने तीन प्रकारचे दर असावेत असे म्हटले होते, परंतु 7 दर लागू करण्यात आले होते. हे दर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% आहेत.